नात्याला काळीमा, दारूच्या नशेत निर्दयी पित्याने मुलाला रिक्षावर आपटलं

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2018 12:40 IST2018-07-10T12:12:34+5:302018-07-10T12:40:25+5:30

हैदराबादमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे.

man in inebriated state bangs his 3 yr old son against an auto rickshaw incident of hyderabad | नात्याला काळीमा, दारूच्या नशेत निर्दयी पित्याने मुलाला रिक्षावर आपटलं

नात्याला काळीमा, दारूच्या नशेत निर्दयी पित्याने मुलाला रिक्षावर आपटलं

हैदराबाद : हैदराबादमध्ये वडील आणि मुलाच्या नात्याला काळीमा फासणारी एक घटना समोर आली आहे. एका निर्दयी पित्याने दारूच्या नशेत पत्नीशी भांडण करून आपल्या तीन वर्षाच्या चिमुकल्याला बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक घडला आहे.

संतापलेल्या पतीने पत्नीशी कडाक्याचं भांडण झाल्यानंतर आपल्या तीन वर्षाच्या मुलाला अत्यंत क्रूरतेने समोर उभ्या असलेल्या एका ऑटो रिक्षावर आपटलं. तसेच त्यानंतरही त्याने मुलाला बेदम मारहाण केली. या संपूर्ण घटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. यातील धक्कादायक बाब म्हणजे हा संपूर्ण प्रकार हा पोलिसांसमोर घडला. 



आरोपी आणि पोलिसांमध्ये मुलावरून थोडावेळ झटापटही झाली. या झटापटीत आरोपीच्या तावडीतून तीन वर्षाच्या चिमुकल्याला सोडवण्यात पोलिसांना यश आलं असून पोलिसांनी बाल कल्याण समितीकडे मुलाला सूपूर्द केले आहे. तसेच आरोपीविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे. या संपूर्ण झटापटीत आरोपी फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. 

Web Title: man in inebriated state bangs his 3 yr old son against an auto rickshaw incident of hyderabad