शहरं
Join us  
Trending Stories
1
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
2
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
3
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
4
"वडिलांना सोडून जाण्याइतका मी पाषाणहृदयी नाही...", अजितदादांवर रोहित पवारांचा पलटवार
5
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
6
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
7
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
8
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप
9
उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, नाशिकमध्ये खिंडार; एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची ताकद वाढली
10
Shark Tank India नं 'या' Startup ला पाठवली कायदेशीर नोटीस, वाचा नक्की कशावरुन झाला वाद?
11
एसटी बसेस निवडणूक कामात व्यस्त, प्रवासी मात्र त्रस्त
12
जी भाषा पाकिस्तान करतेय तीच भाषा काँग्रेस का करतेय?; BJP नेते आशिष शेलारांचा सवाल
13
राहुल गांधी रायबरेलीत का पोहोचले? अमेठी का सोडली...
14
'नम्रतासाठी भूमिका लिहिल्या जातील...' सलील कुलकर्णींनी 'नाच गं घुमा'वर शेअर केली पोस्ट
15
'जेव्हा इंडस्ट्रीमधले लोकच...'; मॅडनेस मचाएंगे'मध्ये करण जोहरची उडवली खिल्ली, पोस्ट शेअर करत दिली प्रतिक्रिया
16
आजचे राशीभविष्य, ६ मे २०२४ : मेषसाठी काळजीचा अन् वृषभसाठी आनंदाचा दिवस
17
संपादकीय: झपाटलेल्या झुंडीचे बळी
18
धुरळा शांत; तिसऱ्या टप्प्याचे उद्या मतदान; आरोप-प्रत्यारोपांनी गाजला रणसंग्राम
19
तापमानाने जिवाची काहिली; सोलापूर, अकोला सर्वाधिक उष्ण; मुंबईत उकाडा कायम
20
नीट-पीजीची परीक्षा आता विभागनिहाय; ऐन वेळी रचनेत बदल करण्याच्या निर्णयामुळे विद्यार्थी नाराज

'ममता बॅनर्जी ईडी-सीबीआयला घाबरल्या', UPA वर केलेल्या वक्तव्यावर काँग्रेस नेत्याचा पलटवार

By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2021 11:59 AM

'आमचे नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सर्वसामान्यांच्या प्रश्नासाठी लढत आहेत. त्यांच्याविरोधात अशी वक्तव्य देणे योग्य नाही.'

नवी दिल्ली: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवर केलेल्या टीकेला आता काँग्रेस नेते मल्लिकार्जुन खर्गे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. खर्गे यांनी ममतांवर भाजपला मदत करत असल्याचा आरोप केला आहे. तसेच, ईडी आणि सीबीआयच्या भीतीपोटी ममता अशी वक्तव्ये करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

आमचा नेता सर्वसामान्यांसाठी लढतोयएका वृत्त वाहिनीशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणाले, आमचे नेते राहुल गांधी देशातील प्रत्येक मुद्द्यावर लढत आहेत. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर कोण लढलं, कोण महागाईवर लढलं? प्रियांका गांधी युपीमध्ये लढत आहेत. आजही आम्ही शेतकऱ्यांसाठी लढत आहोत. प्रत्येक मुद्द्यावर आमचा लढा सुरूच आहे. आम्ही लढलो नसतो तर एवढ्या राज्यात आमचे सरकार स्थापन झाले नसते. आमच्याबद्दल असे वक्तव्य योग्य नाही, असेही खर्गे म्हणाले.

ममता ईडी-सीबीआयला घाबरल्याते पुढे म्हणाले, माझा नेता शेतकऱ्यांसाठी, दलितांसाठी, महिलांसाठी, महागाईविरोधात लढा देत आहे. जेव्हा तुम्ही लढवय्यांबद्दल अशी टीका करता, तेव्हा त्याचा भाजपला फायदा होतो. मला वाटतं की, ममता ईडी आणि सीबीआयला घाबरुन अशी वक्तव्ये करत आहेत. त्यांच्या अशा वक्तव्यामुळे फक्त भाजपलाच फायदा होणार आहे. मला वाटतं की, भाजपविरोधात लढा द्यायचा असेल, तर अशी वक्तव्ये टाळली पाहिजेत.

यूपीए आता आहे कुठे?मुंबई दौऱ्यात ममता बॅनर्जींनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सुप्रिमो शरद पवार यांची भेट घेतली आणि काँग्रेस नेतृत्वावर निशाणा साधत भाजपविरोधात एकजुटीने लढा देण्यावर भर दिला. यूपीए आता आहे कुठे? यूपीए आता नाही, असे म्हणत ममता बॅनर्जी यांनी भाजपविरोधात काँग्रेसच्या नेतृत्वातील ‘यूपीए’ ऐवजी समविचारी पक्षांचा नवा पर्याय देण्याचे स्पष्ट संकेत बुधवारी दिले.

परदेशात राहून राजकारण अशक्ययावेळी ममतांनी काँग्रेस आणि राहुल गांधींवरही टीका केली. परदेशात राहून राजकारण करता येत नाही. रस्त्यावर उतरला नाही, तर भाजप तुम्हाला क्लीन बोल्ड करेल, असा टोला लगावला. तसेच, तुम्ही काँग्रेसच्या विरोधात का लढत आहात, असा प्रश्न उपस्थितांपैकी एकाने विचारला. यावर बोलताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, काँग्रेस आणि डावे पक्ष आमच्याविरोधात बंगालमध्ये लढले. त्यामुळे आता आम्हीही काँग्रेसविरोधात कंबर कसली आहे. भाजपला पराभूत करण्यासाठी आपल्याला हा लढा द्यावाच लागेल, असे ममता बॅनर्जी यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMamata Banerjeeममता बॅनर्जीRahul Gandhiराहुल गांधीPriyanka Gandhiप्रियंका गांधी