शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधींनी इंडिया आघाडीचं नेतृत्व सोडावं; मणिशंकर अय्यर यांचं वक्तव्य, दुसरं नावंही सुचवलं!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 23, 2026 12:59 IST

Mani Shankar Aiyar: काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी आणि इंडिया आघाडीय्या नेतृत्वाबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिशंकर अय्यर यांनी राहुल गांधी यांच्याबद्दल केलेल्या एका खळबळजनक विधानामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली. राहुल गांधींनी इंडिया आघाडीचे नेत्तृत्व सोडावे आणि ही जबाबदारी प्रादेशिक नेत्यांकडे सोपवावी, असा सल्ला अय्यर यांनी दिला आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यामुळे काँग्रेस नेत्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून अनेकांनी त्यांच्यावर टीका केली आहे. 

एका कार्यक्रमात बोलताना अय्यर यांनी स्पष्ट केले की, राहुल गांधींनी आघाडीचे नेतृत्व ममता बॅनर्जी, एम.के. स्टॅलिन, अखिलेश यादव किंवा तेजस्वी यादव यांच्यापैकी कोणाकडे तरी सोपवावे. "राहुल गांधींनी स्वतः नेतृत्व करण्याचा प्रयत्न करण्याऐवजी छोट्या पक्षांतील नेत्यांना संधी द्यावी. जर दुसऱ्या कोणाकडे ही जबाबदारी असेल, तर त्यांना आघाडी मजबूत करण्यासाठी अधिक वेळ देता येईल," असे अय्यर म्हणाले. 

अय्यर यांचे हे विधान अशा वेळी आले, जेव्हा इंडिया आघाडीत राहुल गांधींच्या नेतृत्वावरून मतभेद असल्याची चर्चा आहे. ममता बॅनर्जी सध्या आघाडीपासून अंतर राखून आहेत, तर अखिलेश यादव आणि तेजस्वी यादव यांच्याकडूनही राहुल गांधींना अपेक्षित महत्त्व मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर अय्यर यांनी प्रादेशिक नेत्यांना झुकते माप देण्याचे सुचवले आहे.

मणिशंकर अय्यर यांच्या विधानानंतर काँग्रेस पक्षातूनच त्यांच्यावर टीका होत आहे. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर आलेल्या या विधानामुळे बंगाल काँग्रेसने आक्रमक पवित्रा घेतला आहे. काँग्रेस सरचिटणीस सुमन रॉय चौधरी यांनी अय्यर यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, "मणिशंकर अय्यर बऱ्याच काळापासून सक्रिय राजकारणातून आणि पक्षाच्या निर्णय प्रक्रियेतून दूर आहेत. त्यांचे विधान हे पक्षाचे अधिकृत मत नाही. ममता बॅनर्जी पडद्यामागून भाजपच्या बाहुल्या म्हणून काम करत आहेत, हे कदाचित अय्यर यांना माहित नसावे."

बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अय्यर यांच्या विधानामुळे काँग्रेस आणि तृणमूल काँग्रेसमधील संघर्ष पुन्हा चव्हाट्यावर आला आहे. राहुल गांधींच्या नेतृत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे विरोधकांना आयते कोलीत मिळाले असून, आगामी काळात इंडिया आघाडीत फूट पडण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Mani Shankar Aiyar: Rahul Gandhi should leave India alliance leadership.

Web Summary : Mani Shankar Aiyar suggests Rahul Gandhi relinquish India alliance leadership to regional leaders like Banerjee or Stalin. Congress leaders criticized Aiyar's statement. This sparked controversy amid existing leadership disagreements within the India alliance.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीPoliticsराजकारणcongressकाँग्रेस