गुंडाचा पक्ष असलेल्या भाजपकडे निवडणुकीत पैसे येतात कुठून: ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 21, 2019 17:25 IST2019-07-21T17:23:36+5:302019-07-21T17:25:26+5:30
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी ह्या कोलकाता येथील जाहीर सभेत बोलत होत्या.

गुंडाचा पक्ष असलेल्या भाजपकडे निवडणुकीत पैसे येतात कुठून: ममता बॅनर्जी
कोलकाता - लोकसभा निवडणुकीत सर्वधिक चर्चेत आलेला भाजप आणि पाचीम बंगालच्या मुख्यमंत्री ममता ममता बॅनर्जी यांच्यातील राजकीय युद्ध अजूनही थांबायचे नाव घेत नाही. कोलकाता येथे एका सभेत बोलताना ममता बॅनर्जी यांनी पुन्हा एकदा भाजपवर हल्ला चढवला आहे. भाजप हा गुंडाचा पक्ष असून, निवडणुका लढवण्यासाठी त्यांच्याकडे एवढे पैसे येतात कुठून असा प्रश्न ममता यांनी यावेळी उपस्थित केला.
लोकसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच ममता बॅनर्जी ह्या कोलकाता येथील जाहीर सभेत बोलत होत्या. यावेळी त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपवर जहरी टीका केली, भाजप आता गुंडाचा पक्ष झाला आहे. देशातील प्रत्येक निवडणुकीत पैश्यांचा पूर वाहणाऱ्या भाजपकडे एवढे पैसे येतात कुठून, असा सवाल ममता यांनी यावेळी उपस्थित केला. तसेच भाजपने डाव्या पक्षांना आपले लक्ष बनवले असून, त्यातील अनेकजण भाजपसाठी काम करत असल्याचा दावा सुद्धा ममता यांनी यावेळी केला.
याच सभेत ममता यांचे पुतणे आणि तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार अभिषेक बॅनर्जी यांनी सुद्धा भाजपवर ईव्हिएम मशीनवरून भाजपवर निशाना साधला. भाजपने माझ्या मतदारसंघात वाटेल तेवढ्यावेळी निवडणूक घ्यावी मी त्यांचा पराभव करून दाखवेल, पण या निवडणुका बैलेट पेपर घेतल्या पाहिजे, असा टोला अभिषेक यांनी यावेळी लगावला.