शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

'लोकांना मूर्ख बनवणे सुरू आहे...', मल्लिकार्जुन खरगेंचा पीएम मोदींवर घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2024 17:20 IST

Mallikarjun Kharge: 'भाजप देशातील संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे.'

Mallikarjun Kharge on PM Modi: लोकसभा निवडणूक जवळ आली आहे, त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक सातत्याने एकमेकांवर टीका करत आहेत. यातच आता, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर घणाघाती टीका केली. 'भाजप देशातील संविधान नष्ट करण्याचे काम करत आहे. एकीकडे पीएम मोदी संविधान सुरक्षित असल्याचे सांगतात, तर दुसरीकडे त्यांचे खासदार संविधान बदलण्याची भाषा करतात,' अशी टीका खरगे यांनी केली.

'संविधान बदलण्यासाठी 400 पार चा नारा'माध्यमांशी संवाद साधताना मल्लिकार्जुन खरगे म्हणतात, 'पंतप्रधान मोदींमध्ये हिंमत असेल, तर त्यांनी अशी वक्तव्ये करणाऱ्या नेत्यांनी पक्षातून बाहेर काढावे. भाजप नेहमीच सामाजिक न्यायाच्या आणि धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात आहे. RSS आणि मोहन भागवत देशातून आरक्षण आणि संविधान संपवण्याचे काम करत आहेत. आजही आरएसएस भगव्या झेंड्यासमोर भारताच्या तिरंग्याला फारसे महत्त्व देत नाही. मोदीजी देशाचे संविधान बदलण्यासाठी 400 पारचा नारा देत आहात का?' असा सवालही त्यांनी यावेळी केला. 

संविधान बदलण्याचा प्रयत्न केल्यास...'कोणी संविधान बदलण्याचा प्रयत्न केला तर देशात मोठा गदारोळ होईल. अशा प्रयत्नांचा आम्ही निषेध करतो. पंतप्रधान आजकाल हिंदी सोडून प्रादेशिक भाषेत बोलून लोकांना मूर्ख बनवण्याचा प्रयत्न करत आहेत. भाजपने देशाची राज्यघटना पूर्णपणे स्वीकारली नाही, हे खेदजनक आहे. एलेक्टोरल बाँड्सप्रकरणात एसबीआयने सर्वोच्च न्यायालयाकडे वेळ मागितला, यावरुन हे स्पष्ट होते की, मोदी सरकार आपली काळी कृत्ये लपवण्याचा प्रयत्न करत आहे. एवढा वेळ कशाला हवाय? सरकारला निवडणुकीपर्यंत सत्य लपवायचे आहे,' अशी टीकाही त्यांनी केली. 

टॅग्स :Mallikarjun Khargeमल्लिकार्जुन खर्गेNarendra Modiनरेंद्र मोदीlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४