हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2025 17:10 IST2025-07-31T17:08:54+5:302025-07-31T17:10:14+5:30

Malegaon Blast Case News: मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याच्या निकालानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, भाजपासह इतर हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना या निकालाचे स्वागत करत आहेत. तर धर्मनिरपेक्ष संघटनांकडून या निकालाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत.

Malegaon Blast Case: Hindus can also be terrorists! Senior Congress woman leader Renuka Chowdhury expresses clear opinion after Malegaon result | हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 

हिंदूही दहशतवादी असू शकतात! मालेगाव निकालानंतर काँग्रेसच्या ज्येष्ठ महिला नेत्यानं मांडलं स्पष्ट मत 

नाशिकमधील मालेगाव येथे झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा सुमारे १७ वर्षांनंतर निकाल लागला असून, यामध्ये एनआयएच्या विशेष न्यायालयाने सर्व सातही आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. यामध्ये भाजपाच्या माजी खासदार प्रज्ञा सिंह ठाकूर यांचाही समावेश आहे. दरम्यान, या निकालानंतर आता वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत असून, भाजपासह इतर हिंदुत्ववादी पक्ष आणि संघटना या निकालाचे स्वागत करत आहेत. तर धर्मनिरपेक्ष संघटनांकडून या निकालाविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. दरम्यान, काँग्रेसच्या खासदार रेणुका चौधरी यांचीही प्रतिक्रिया समोर आली असून, हिंदूसुद्धा दहशतवादी असू शकतात असं त्यांनी म्हटलं आहे. 

मालेगावच्या निकालावर प्रतिक्रिया देताना रेणुका चौधरी म्हणाल्या की, हिंदूसुद्धा दहशतवादी असू शकतात. जेव्हा आपण मुस्लिम दहशतवाद म्हणतो तेव्हा हिंदू दहशतवाद म्हणणंही भाग पडतं, असं विधान रेणुका चौधरी यांनी केला.

दरम्यान, सरकारी पक्ष बॉम्ब दुचाकीमध्येच ठेवलेला होता हे सिद्ध करू शकला नाही, असे मालेगाव बॉम्बस्फोट खटल्याचा निकाल देताना एनआयए कोर्टाने सांगितले.
 

Web Title: Malegaon Blast Case: Hindus can also be terrorists! Senior Congress woman leader Renuka Chowdhury expresses clear opinion after Malegaon result

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.