शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War Ceasefire Update: हमासला युद्धविरामाच्या सर्व अटी मान्य, आता इस्रायलच्या भूमिकेकडे लक्ष; गाझावासीयांना दिलासा मिळणार?
2
सूर्यकुमार यादवचे वादळी शतक! तिलकच्या साथीने SRH ला झोडले, MI ला संकटातून बाहेर काढून विजयी केले 
3
"माझा 100 दिवसांचा आराखडा तयार, निकाल लागल्यानंतर..."; पंतप्रधान मोदींचा 'इरादा पक्का'
4
दारूड्या कारचालकाचा कहर! चक्क पोलीस निरीक्षकाच्या कारलाच दिली जोरदार धडक
5
KKR चे चार्टर्ड विमान अचानक कोलकाताऐवजी गुवाहाटीकडे वळवावे लागले; वाचा नेमके काय घडले
6
गाझातील युद्धविरामाची चर्चा अनिर्णित, भडकलेल्या इस्रायलचे राफावर एयर स्ट्राइक
7
भारतीय वंशाच्या सुनीता विल्यम्स इतिहास रचणार, 12 वर्षांनंतर तिसऱ्यांदा अंतराळात जाणार...
8
राहुल गांधींनी काँग्रेस कार्यकर्त्यांकडं काय मागितलं? निवडणुकीच्या धामधुमीत लिहिलं भावनिक पत्र!
9
ठाणे लोकसभा मतदारसंघासाठी 24 उमेदवार रिंगणात; चिन्हे झाली जाहीर, पाहा कुणाला काय?
10
सभांमध्ये वेगळेच विषय गाजले, पण 'वहिनीं'च्या कार्यकर्त्यांनी गावचे मुद्दे मांडले; प्रचारतंत्र 'पवारफुल्ल' ठरेल?
11
नवी मुंबईत यापुढे सबकुछ गणेश नाईक! फडणवीसांच्या आश्वासनावरच शांत झाले भाजपा कार्यकर्ते
12
मुंबई विद्यापीठाचा बी. कॉम सत्र ६ चा निकाल जाहीर; परीक्षेत १६,६३६ विद्यार्थी उत्तीर्ण
13
आव्हान संपल्यावर मुंबई इंडियन्सला सूर गवसला; T20 वर्ल्ड कपपूर्वी हार्दिक पांड्याही फॉर्मात आला
14
काँग्रेसच्या विजय वडेट्टीवारांविरोधात भाजपाची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार; 'त्या' विधानावरून भाजपा आक्रमक
15
नवी मुंबई आंतराष्ट्रीय विमानतळावर दिबांच्याच नावाची घोषणा होणार- देवेंद्र फडणवीस
16
CM अरविंद केजरीवालांचा पाय आणखी खोलात; नायब राज्यपालांनी केली NIA चौकशीची मागणी
17
'काँग्रेस तुमचे पैसे वाटेल...' मल्लिकार्जुन खरगेंचे अपूर्ण विधान खोट्या दाव्यासह व्हायरल
18
भारतीय संघाच्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेच्या जर्सीचं हटके लॉचिंग! Video Viral 
19
माढ्यात धैर्यशील मोहिते पाटलांची ताकद वाढली! भालके गटाचा पाठिंबा जाहीर; समीकरणे बदलणार?
20
"भाजपा खूप दिवसांपासून दिवास्वप्न पाहतेय..."; नवीन पटनायक यांचा पंतप्रधान मोदींवर पलटवार

आता लग्नाच्या खर्चाचाही द्यावा लागणार हिशेब, सर्वोच्च न्यायालयाची केंद्राला सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 12, 2018 4:25 PM

सर्वोच्च न्यायालयानं विवाहात होणा-या खर्चाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.

नवी दिल्ली- सर्वोच्च न्यायालयानं विवाहात होणा-या खर्चाबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे. केंद्र सरकारनं विवाह समारंभात होणा-या खर्चाचा हिशेब मिळण्यासंदर्भात एक नवा कायदा करण्याची गरज आहे. जेणेकरून लग्नात किती खर्च केला, याची माहिती मिळू शकेल. केंद्र सरकारनं लग्नकार्यात होणा-या खर्चाबाबत खुलासा करावा, असंही सर्वोच्च न्यायालयानं स्पष्ट केलं आहे.न्यायालयाच्या मते, पती आणि पत्नी या दोन्हीकडच्या मंडळींनी लग्नकार्यात किती खर्च आला, यासंदर्भात मॅरेज ऑफिसरला लिखित स्वरूपात माहिती देणं अनिवार्य केलं पाहिजे. सरकारनं नियम आणि कायदे तपासून या प्रकरणात संशोधन करून नवा कायदा करणं आवश्यक आहे. सरकारकडून याची अंमलबजावणी झाल्यास हुंडा देण्या-घेण्यासारख्या प्रकारांना आळा बसू शकतो. तसेच हुंड्यासंदर्भात दाखल होणा-या खोट्या तक्रारीही कमी होतील. लग्नातील खर्चाचा ठरावीक हिस्सा पत्नीच्या बँक खात्यातही जमा करता येऊ शकतो. जेणेकरून भविष्यात पत्नीला त्या पैशाचा उपयोग करता येईल.न्यायालयानं केंद्र सरकारला यासंदर्भात एक नोटीस पाठवली असून, स्वतःच्या कायदेतज्ज्ञाच्या सल्ल्यानुसार या प्रकरणात मत व्यक्त करण्याचे आदेश दिले आहेत. न्यायालयात लग्नासंदर्भातील एका याचिकेवर सुनावणी झाली. त्यावेळी हा आदेश देण्यात आला. या प्रकरणात पीडित पत्नीनं पती आणि त्यांच्या सास-यांविरोधात हुंडा घेण्यासारखे अनेक आरोप केले आहेत. परंतु पतीकडच्या मंडळींनी ते सर्व फेटाळून लावले आहेत.  त्यावरून सर्वोच्च न्यायालयानं अशा प्रकारचा कायदा करण्याची सूचना केली आहे.  

टॅग्स :marriageलग्नSupreme Courtसर्वोच्च न्यायालयCentral Governmentकेंद्र सरकार