‘मेक इन इंडिया’ होतोय ‘रेप इन इंडिया’: अधीररंजन चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2019 06:06 IST2019-12-11T04:04:55+5:302019-12-11T06:06:18+5:30

तेलंगणामधील पशुवैद्यक युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह जाळून टाकला.

'Make in India' is becoming 'Rap in India': Adhiranjan Chaudhary | ‘मेक इन इंडिया’ होतोय ‘रेप इन इंडिया’: अधीररंजन चौधरी

‘मेक इन इंडिया’ होतोय ‘रेप इन इंडिया’: अधीररंजन चौधरी

नवी दिल्ली : बलात्कार व अन्य लैंगिक अत्याचारांच्या वाढत्या घटनांमुळे देशाचा प्रवास हळुहळू ‘मेक इन इंडियाकडून ‘रेप इन इंडियाकडे होत आहे अशी उपरोधिक टीका काँग्रेसचे लोकसभेतील गटनेते अधीररंजन चौधरी यांनी केली आहे.

तेलंगणामधील पशुवैद्यक युवतीवर सामुहिक बलात्कार केल्यानंतर आरोपींनी तिचा मृतदेह जाळून टाकला. उत्तर प्रदेशातल्या उन्नाव येथील बलात्कार पीडिता आरोपींनी जिवंत जाळल्याने मरण पावली. या घटनांच्या पार्श्वभूमीवर अधीररंजन चौधरी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मेक इन इंडिया घोषणेचे विडंबन केले आहे.

बलात्काराची राजधानी : राहुल गांधी

भारत बलात्काराच्या घटनांची राजधानी बनत असल्याची टीका काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी केली आहे. मोदी सरकारच्या काळात महिला व शेतकऱ्यांवर गोळीबार केला जात आहे. कोणत्याही कामासाठी घराबाहेर जाताना महिलांच्या मनात भीती दाटलेली असते असे त्यांनी झारखंडमधील एका प्रचारसभेत सांगितले.

Web Title: 'Make in India' is becoming 'Rap in India': Adhiranjan Chaudhary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.