शहरं
Join us  
Trending Stories
1
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी
2
अजित पवार यांच्या रडारवर येणार तरी कोण? चर्चेला उधाण; निकालाची उत्सुकता शिगेला
3
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
4
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
5
लोकसभेनंतर विधानपरिषदेतही उद्धवसेनेची उमेदवारीची घाई; मुंबई पदवीधर मतदारसंघातून अनिल परब!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींवर बाप्पाची कृपा, शासकीय कामात लाभ; पदोन्नती योग; व्यापारवृद्धी!
7
वेळ बदलली, त्यामुळे चेहरा बदलला आहे...; भुजबळ समर्थकांच्या रील्समुळे पुन्हा चर्चेला उधाण
8
पुणे पोर्शे कार अपघात प्रकरण विशेष लेख: 'बाळा'ने खरंच दोघांचा जीव घेतला का..?
9
विशेष लेख: सीईटी द्यायच्या तरी किती? भारंभार परीक्षांच्या माऱ्यांमुळे कॉलेज जीवन संपुष्टात
10
विषमुक्त अन्नधान्यासाठी रासायनिक, सेंद्रिय नव्हे, नैसर्गिक शेतीच सर्वोत्तम- गुजरातचे राज्यपाल
11
पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘मी तर अविनाशी...’; अनेक वर्षे पंतप्रधानपदी राहण्याचे भाषणातून संकेत
12
IPL 2024: कोलकाता-हैदराबाद आज विजेतेपदासाठी आमनेसामने... कोण बनणार चॅम्पियन?
13
प.बंगालची आघाडी कायम; सर्वाधिक ७९.३५% मतदान; सहाव्या टप्प्यात एकूण ६१.०४ टक्के मतदान
14
भाव वधारताच वाढली सोने तस्करी! गतवर्षी पकडले ५०० किलो सोने, काही कारखाने उद्ध्वस्त
15
१० जूनला मान्सून मुंबईत पोहोचणार? शहरात शनिवारी संपूर्ण दिवसभर होतं ढगाळ वातावरण
16
दहावीचा निकाल उद्या दुपारी १ वाजता 'ऑनलाइन'! गुण पडताळणीसाठी २८ मे पासून अर्ज
17
सायन रुग्णालयात डॉक्टरने वृद्ध महिलेला उडविले; उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू, डॉक्टरला अटक
18
कारच्या बोनेटवर बसून केलेली स्टंटबाजी भोवली; अल्पवयीन चालकासह तरुण पोलिसांच्या ताब्यात
19
आशिष शेलारांचे ‘कहीं पे निगाहें कहीं पे निशाणा’? मुख्यमंत्र्यांच्या आढावा बैठकीनंतरही नालेसफाईची पाहणी
20
दिवाळीत नव्या घरात जाणार रणबीर-आलिया? बांधकामाची सुरू असलेल्या घराची पाहणी

राज्यसभेत भाजपला कामचलाऊ बहुमत, मित्रांखेरीज अन्यांचीही मदत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 25, 2019 4:22 AM

तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत.

- हरीश गुप्तानवी दिल्ली  -  तेलगू देसमचे चार सदस्य भाजपमध्ये दाखल झाल्याने भाजपला राज्यसभेत आताच कामचलाऊ बहुमत मिळाले आहे. मित्रपक्ष व मदतीला येणारे पक्ष यांच्या आधारे भाजपकडे आताच ११२ सदस्य झाले आहेत.तेलगू देसमच्या चार खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे भाजपची राज्यसभेतील सदस्यसंख्या ७५ झाली आहे. शिवाय राष्ट्रीय लोकशाही आघाडीतील २४ सदस्यांचा (जद (यू) चे ६, शिवसेना व अकाली दलाचे प्रत्येकी ३, आगप, बीपीएफ, एनपीएफ, रिपब्लिकन व एसडीएफ यांचे प्रत्येकी १ मिळून १७. शिवाय तीन राष्ट्रपतीनियुक्त व चार अपक्ष खासदार) पाठिंबा आहे. अण्णा द्रमुकचे १३ सदस्यही सरकारच्या पाठिशी असल्याने संख्या होते ११२. राज्यसभेची सदस्यसंख्या २३६ असली तरी ९ जागा रिकाम्या असल्याने प्रत्यक्ष सदस्य आहेत २२५.बिजू जनता दलही (५ सदस्य) भाजपला मदत करतो व वायएसआर काँग्रेसचा (२) पाठिंबा मिळू शकतो. ज्या ९ जागांच्या निवडणुका व्हायच्या आहेत, त्यापैकी ५ जागा भाजप व मित्रपक्षांना मिळतील. परिणामी भाजप, मित्रपक्ष व अन्य मदत करणारे पक्ष यांची संख्या १२४ होईल. मग तेलंगणा राष्ट्र समितीने (६) पाठिंबा दिला नाही, तरीही भाजपचे अडणार नाही.तिहेरी तलाकविरोधी विधेयकाला मात्र जद (यू), टीआरएस व वायएसआर काँग्रेस यांचा आक्षेप आहे. ते विधेयकाच्या बाजूने मतदान करतील, याची खात्री नाही. पण विरोधाऐवजी हे पक्ष मतदानात सहभागी न होण्याची शक्यता आहे. शिवाय तृणमूल काँग्रेसचे १३ पैकी काही राज्यसभा सदस्य फुटण्याची चर्चा आहे. जनता दल (एस) चा एकच सदस्य असून, तोही प्रसंगी सरकारच्या मदतीला येऊ शकतो.पुढील वर्षी स्पष्ट बहुमतयाप्रकारे भाजप व रालोआकडे स्पष्ट बहुमत नसले तरी अन्यांच्या मदतीने सरकारला राज्यसभेतील कामकाज चालवण्यासाठी कामचलाऊ बहुमत आताच मिळाले आहे.अर्थात पुढील वर्षी राज्यसभेच्या ७२ जागांसाठी निवडणूक होणार आहे. त्यात भाजपची सत्ता असलेल्या राज्यांचा समावेश असून, त्यामुळे त्या निवडणुकीनंतर भाजपला राज्यसभेत स्पष्ट बहुमत मिळू शकेल.

टॅग्स :ParliamentसंसदRajya Sabhaराज्यसभाBJPभाजपा