स्लीपर वंदे भारत ट्रेनवर मोठी अपडेट! राजधानीपेक्षा अधिक वेगवान; कधीपर्यंत सुरू होणार?
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2024 17:49 IST2024-02-05T17:46:45+5:302024-02-05T17:49:29+5:30
Sleeper Vande Bharat: स्लीपर वंदे भारत ट्रेन नेमकी कधी येईल? याबाबत संबंधित अधिकाऱ्यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे.

स्लीपर वंदे भारत ट्रेनवर मोठी अपडेट! राजधानीपेक्षा अधिक वेगवान; कधीपर्यंत सुरू होणार?
Sleeper Vande Bharat: वंदे भारत ट्रेनच्या स्लीपर व्हर्जनबाबत प्रवाशांमध्ये अधिक उत्सुकता असल्याचे पाहायला मिळत आहे. विद्यमान वंदे भारत ट्रेनपेक्षा स्लीपर वंदे भारत ट्रेनमध्ये नवीन काय मिळणार, याकडे लक्ष लागले आहे. यातच नवीन स्लीपर वंदे भारत ट्रेन ही राजधानीपेक्षा अधिक वेगाने जाईल, असे सांगितले जात आहे.
वंदे भारत स्लीपर ट्रेनचे पहिले प्रोटोटाइप मार्चपर्यंत तयार होण्याची अपेक्षा आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, एप्रिलमध्ये त्याची चाचणी घेतली जाईल आणि लवकरच ही ट्रेन कार्यान्वित होईल. वंदे भारत स्लीपर ही ट्रेन आयसीएफमध्ये डिझाइन केल्या जातील. तसेच प्रवासाचा वेळ दोन तासांनी कमी होऊ शकेल, अशी माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.
दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या मार्गावर सर्वप्रथम लोकार्पण
अधिकाऱ्याने नाव न सांगण्याच्या अटीवर पुढे सांगितले की, स्लीपर वंदे भारत ट्रेन सर्वप्रथम दिल्ली-मुंबई आणि दिल्ली-हावडा या मार्गावर धावेल. दुसऱ्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, वंदे भारत स्लीपर ट्रेनमध्ये आधुनिक इंटिरियर डिझाइन असेल. या ट्रेनमध्ये १६ डबे असतील. ३ टियर, २ टियर आणि 1AC कोचचा समावेश असेल. ICF आणि BEML नवीन स्लीपर ट्रेन तयार करत आहे. बर्थ, एअर डक्ट, केबल डक्ट, वॉशरूमच्या डिझाइनवर काम केले जात आहे. सध्या BEML कंपनी ही ICFसाठी अशा दहा ट्रेन तयार करत आहे.
दरम्यान, वंदे भारतचे ट्रेनचे डबे स्टेनलेस स्टीलचे बनलेले आहेत. म्हणून ते हलके आणि मजबूत आहे. हे डबे जास्तीत जास्त २०० किलोमीटर प्रतितास वेगाने धावण्यासाठी डिझाइन केलेले आहेत. ऑनबोर्ड वायफाय उपलब्ध आहे. मोबाईल आणि लॅपटॉप चार्ज करण्यासाठी प्रत्येक सीटजवळ चार्जिंग पॉईंट दिलेले आहेत. यात जीपीएस यंत्रणा बसवण्यात आली असून, त्याद्वारे प्रवाशांना येणाऱ्या स्थानकांची माहिती आणि इतर माहिती मिळते.