Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठी घडामोड; मोदी सरकारमधील एक मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2021 12:59 PM2021-07-06T12:59:30+5:302021-07-06T13:11:03+5:30

Governor's appointment by Precedent Ramnath Kovind: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये एका कॅबिनेट मंत्र्यांचाही समावेश आहे.

Major developments before cabinet expansion; Cabinet Minister Thawar Chand Gehlot appointed Governor of Karnataka | Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठी घडामोड; मोदी सरकारमधील एक मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्तारापूर्वी मोठी घडामोड; मोदी सरकारमधील एक मंत्र्याचा राजीनामा, राज्यपालपदी नियुक्ती

Next

Cabinet Expansion: पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रीमंडळ विस्ताराच्या आधीच विविध राज्यांच्या राज्यपालांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये कॅबिनेट मंत्री थावरचंद गेहलोत (Thawar Chand Gehlot) यांना मंत्रिपदावरून हटवून कर्नाटक राज्याचे राज्यपाल (Governor) बनविण्यात आले आहे. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हे आदेश दिले आहेत. (Precedent Ram nath kovind appoint Governor's of Karnataka, Madhya Paradesh, himachal pradesh and other states.)

Cabinet Expansion: मंत्रिमंडळ विस्ताराची बैठक अचानक रद्द; मोदी रात्रीच शहांना भेटले

 मिझोरामचे राज्यपाल पदी हरि बाबू कमभमपति,  मध्य प्रदेशच्या राज्यपालपदी मंगूभाई छगनभाई पटेल, हिमाचल प्रदेशच्या राज्यपालपदी राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. 

तर मिझोरामचे सध्याचे राज्यपाल पीएस श्रीधरन पिल्लई यांना गोव्याचे राज्यपाल, हरियाणाचे राज्यपाल सत्यदेव नारायण आर्य यांना त्रिपुराचे राज्यपाल, त्रिपुराचे राज्यपाल रमेश बैस यांना झारखंडचे राज्यपाल, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांना हरियाणाच्या राज्यपाल पदी नियुक्ती देण्यात आली आहे. 
येत्या दोन दिवसांत मोदी मंत्रिमंडळाचा विस्तार केला जाणार आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय मंत्री गेहलोत यांना हटविण्यात आले आहे. (Thawar Chand Gehlot appointed Governor of Karnataka before modi's Cabinet Expansion)

आजची बैठक रद्द

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (Narendra Modi) निवासस्थानी आज सायंकाळी मोठ्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला गृहमंत्री अमित शहा, जे पी नड्डा, राजनाथ सिंह, निर्मला सितारामन, धर्मेंद्र प्रधान, पीयूष गोयल, प्रह्लाद जोशी आणि नरेंद्र सिंह तोमर हे उपस्थित राहणार होते. परंतू मोदी यांनी काल रात्रीच गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाचे सचिव बी एल संतोष यांची भेट घेतली. यानंतर हा आजची बैठक रद्द करण्याच निर्णय घेण्यात आला आहे. 


 

Web Title: Major developments before cabinet expansion; Cabinet Minister Thawar Chand Gehlot appointed Governor of Karnataka

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.