प्रयागराजमध्ये मोठा अपघात; कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2026 16:52 IST2026-03-23T16:43:25+5:302026-03-23T16:52:42+5:30

प्रयागराजच्या फाफामऊ भागातील एका शीतगृहाची भिंत अचानक कोसळून नऊ कामगारांचा मृत्यू झाला. अमोनिया वायूची पाईप फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे.

Major accident in Prayagraj; 9 laborers die after cold storage wall collapses | प्रयागराजमध्ये मोठा अपघात; कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

प्रयागराजमध्ये मोठा अपघात; कोल्ड स्टोरेजची भिंत कोसळून ९ मजुरांचा मृत्यू

प्रयागराजच्या फाफामऊ परिसरातून एक धक्कादायक घटना समोर आली. एका कोल्ड स्टोरेजची भिंत अचानक कोसळल्याने मोठा अपघात झाला. या अपघातात आतापर्यंत नऊ कामगारांचा मृत्यू झाला आहे. तेथे काम करणारे अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले गेल्याने परिसरात घबराट पसरली आहे. हे शीतगृह चांदपूरच्या एका माजी आमदाराच्या मालकीचे असल्याचे सांगितले जाते. प्रत्यक्षदर्शींच्या म्हणण्यानुसार, भिंत कोसळण्यापूर्वी स्फोटासारखा मोठा आवाज ऐकू आला, त्यानंतर संपूर्ण भिंत अचानक कोसळली.

मिळालेल्या माहितीनुसार, अमोनिया पाईप फुटल्यामुळे हा अपघात झाल्याचे मानले जात आहे. पाईप फुटल्यानंतर वायू गळती सुरू झाली, यामुळे परिस्थिती आणखी बिकट झाली. अमोनिया वायू गळतीमुळे जवळच्या लोकांमध्ये घबराट पसरली आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. अपघात झाला तेव्हा कोल्ड स्टोरेज सुविधेमध्ये सुमारे २० कामगार काम करत होते. भिंत कोसळल्याने अनेक कामगार ढिगाऱ्याखाली गाडले.

अपघातानंतर, जेव्हा बचाव पथक घटनास्थळी पोहोचले, तेव्हा संतप्त गावकऱ्यांनी रुग्णवाहिकेवर दगडफेक केली. पोलिसांशीही जोरदार वाद झाला. आतापर्यंत नऊ मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. जेसीबीच्या साहाय्याने बचावकार्य सुरू आहे. प्रयागराजचे पोलीस आयुक्त जोगिंदर कुमार आणि जिल्हाधिकारी मनीष वर्मा घटनास्थळी दाखल झाले असून, त्यांनी उपस्थित अधिकाऱ्यांसोबत बचावकार्याचा आढावा घेतला आहे.

अनेक कामगार गंभीर अवस्थेत

जखमींना स्वरूप राणी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यापैकी बहुतेकांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. एका प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, जेवणाची वेळ होती. जेवणानंतर सर्वजण आराम करत असतानाच इमारत कोसळली. आत असलेले कोणीही बाहेर पडू शकले नाही.

Web Title : प्रयागराज: कोल्ड स्टोरेज की दीवार गिरने से नौ मजदूरों की मौत

Web Summary : प्रयागराज में कोल्ड स्टोरेज की दीवार गिरने से नौ मजदूरों की मौत हो गई। अमोनिया रिसाव का संदेह है। ग्रामीणों के गुस्से और पथराव के बीच बचाव कार्य जारी है। कई घायल गंभीर हालत में हैं।

Web Title : Prayagraj: Cold storage wall collapse kills nine laborers in accident.

Web Summary : Tragedy in Prayagraj as a cold storage wall collapsed, killing nine laborers. Ammonia leak suspected. Rescue operations underway amidst villagers' anger and stone-pelting. Many injured are in critical condition.

टॅग्स :Accidentअपघात