हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2025 12:36 IST2025-09-25T12:35:43+5:302025-09-25T12:36:10+5:30
एका देवीच्या मंडपात अचानक करंट पसरला. यामुळे शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे.

हृदयद्रावक! नवरात्रीत मोठी दुर्घटना; देवीच्या मंडपात अचानक पसरला करंट; २ मुलांचा मृत्यू
जबलपूरमध्ये नवरात्रीत मोठी दुर्घटना घडली. जबलपूरच्या तिलवाराघाट पोलीस स्टेशन परिसरातील बरगी हिल्स येथील एका देवीच्या मंडपात अचानक करंट पसरला. यामुळे शॉक लागून दोन मुलांचा मृत्यू झाला आहे. दोन्ही मुलं खेळत असताना त्यांनी लोखंडी पाईपला हात लावला. याच दरम्यान त्यांना शॉक लागला. घटनास्थळी उपस्थित असलेल्या लोकांनी त्यांना ताबडतोब उचलून जबलपूर मेडिकल कॉलेजमध्ये नेलं, परंतु तोपर्यंत खूप उशीर झाला होता.
मुलांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाचे पथक घटनास्थळी पोहोचलं आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. बुधवारी ही घटना घडली. मंडपात लाईटिंगचं काम सुरू होतं. अनेक मुलं मंडपात खेळत होती. खेळत असताना या दोन मुलांनी तिथे असलेल्या एका लोखंडी पाईपला हात लावला आणि जोरात ओरडली. त्यांना शॉक लागला होता.
स्थानिक आमदार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री राकेश सिंह यांनी जबलपूरचे जिल्हाधिकारी राघवेंद्र सिंह यांच्याशी चर्चा केली आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले. मंत्री राकेश सिंह यांनी बाधित कुटुंबांना प्रत्येकी २ लाख रुपयांची भरपाई जाहीर केली आहे. या घटनेनंतर शहरातील सर्व देवीच्या मंडपांमध्ये नीट व्यवस्था करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
घटनेची चौकशी करण्यासाठी तीन जणांची टीम देखील तयार केली आहे, ज्यामध्ये एसडीएम गोरखपूर अनुराग सिंह, सार्वजनिक बांधकाम विभागाचे एसडीओ एसके शर्मा आणि वीज कंपनीचे सहाय्यक अभियंता दिनेश पाल यांचा समावेश आहे. त्यांनी तिघांनाही घटनेची चौकशी करून तीन दिवसांत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. या घटनेने मुलाच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.