UP Accident: उत्तर प्रदेशातील बुलंदशहर येथे सोमवारी सकाळीच मोठी अपघाताची घटना घडली. बुलंदशहरमधील राष्ट्रीय महामार्ग ३४ वरील घाटल गावाजवळ कासगंजहून राजस्थानमधील गोगामेडीला जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टरला एका कंटेनर ट्रकने धडक दिली. ट्रॅक्टरमधील ८ जणांचा मृत्यू झाला तर ४३ जण जखमी झाले. मागून येणाऱ्या एका वेगवान कंटेनर ट्रकने ट्रॅकर ट्रॉलीला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॉलीतील भाविक रस्त्यावर फेकले गेले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांसह बचाव पथकांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरु केले.
गोगाजीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांनी भरलेल्या ट्रॅक्टर-ट्रॉलीला एका भरधाव कंटेनर ट्रकने मागून धडक दिल्याने एकाच गावातील आठ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर ४३ जण जखमी झाले. जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. काहींची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे. ही घटना घडली त्यावेळी तेव्हा ट्रॅक्टर ट्रॉलीमध्ये ६१ लोक प्रवास करत होते. सर्व भाविक कासगंजहून राजस्थानमधील गोगामेडी येथे जहारवीर दर्शनासाठी जात होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या एका कॅन्टर ट्रकने ट्रॅक्टर ट्रॉलीला धडक दिली, ज्यामुळे ट्रॅक्टर ट्रॉली जागीच उलटली.
अपघातानंतर २९ जखमींना कैलास रुग्णालयात, १८ जणांना मुनी सीएचसीमध्ये आणि १० जणांना जटिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. जखमींना दाखल करण्यात आले. कैलास रुग्णालयात डॉक्टरांनी दोन मुलांसह सहा जणांना मृत घोषित केले. मुनी सीएचसीमध्ये डॉक्टरांनी दोघांना मृत घोषित केले. ईयू बाबू , रामबेती, चांदनी, घनीराम, मोक्षी, शिवांश, योगेश आणि विनोद अशी मृतांची नावे आहेत.
ज्यामुळे अपघात झाला तो ट्रक हरियाणातील फरीदाबाद येथील संदीप नावाच्या व्यक्तीच्या नावावर आहे. रांचीहून तांदूळ घेऊन जाणाऱ्या ट्रकला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. अचानक मागून भरधाव वेगाने येणाऱ्या एका कंटेनर ट्रकने ट्रॅक्टरला धडक दिली. ही धडक इतकी जोरदार होती की ट्रॅक्टरचे तुकडे झाले आणि अनेक लोक रस्त्यावर दूर फेकले गेले. अपघातानंतर घटनास्थळी गोंधळ उडाला . स्थानिक लोकांनी तात्काळ पोलिसांना आणि रुग्णवाहिकेला माहिती दिली. माहिती मिळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले.