शहरं
Join us  
Trending Stories
1
...तेव्हा आम्ही पाठीशी उभे राहिलो; मोहिते पाटलांच्या पक्षांतरानंतर फडणवीसांचा पहिल्यांदाच हल्लाबोल
2
IPL 2024 CSK vs SRH : मराठमोळा तुषार लै 'हुश्शार'! CSK चा मोठा विजय; SRH चा दारूण पराभव
3
'परीक्षेत जय श्री राम लिहितात अन् 50 % मार्क्स मिळतात', ओवेसींचा मोदी-शहांवर निशाणा
4
चेन्नईच्या फलंदाजाची स्फोटक खेळी! इरफान म्हणाला, याला वर्ल्ड कपच्या संघात घ्यायलाच हवं...
5
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
6
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
7
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
8
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
9
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
10
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
11
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
12
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
13
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
14
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
15
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
16
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
17
IPL 2024 CSK vs SRH : ऋतु'राज'! मराठमोळ्या गायकवाडचे शतक थोडक्यात हुकले; CSK ने धावांचा डोंगर उभारला
18
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
19
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
20
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत

पंतप्रधान मोदींची अवस्था ‘ना घर का ना घाट का' सारखी - माजिद मेमन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2018 1:07 PM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींबाबत आक्षेपार्ह विधान केले.

नवी दिल्ली - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका करताना विरोधकांची जीभ घसरत असल्याचे हल्ली वारंवार पाहायला मिळत आहे. या यादीमध्ये आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजिद मेमन यांचीही भर पडली आहे. ''पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मुसलमानांना आकर्षित करण्यासाठी बोहरा समाजाकडे गेले होते. पण आगामी निवडणुकीत त्यांची अवस्था ना घर का ना घाट का,धोबी का कुत्ता अशी होईल. एकूणच शेवटी ते ना इकडचे राहतील नाही तिकडचे. '', असे वादग्रस्त विधान मेमन यांनी पंतप्रधानांवर टीका करताना केले आहे. 

काही दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी इंदूरमध्ये बोहरा मुस्लिम समाजाच्या कार्यक्रमात सहभागी झाले होते. शांततामय सहजीवनाचा संदेश याच समाजाने जगभर नेला आहे, असे समाजाचे कौतुक मोदींनी केले होते. यावरुन मेमन यांनी मोदींवर निशाणा साधला.

(पंतप्रधान नरेंद्र मोदी अशिक्षित-अडाणी, संजय निरुपम यांची जीभ घसरली)

यापूर्वी भाजपाच्या धोरणांवर हल्लाबोल चढवताना संजय निरुपम यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा अशिक्षित-अडाणी असा उल्लेख केला. पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका करताना त्यांचीही जीभ घसरली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यावर आधारित 'चलो जीते है' लघुपट जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये दाखवण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या निर्णयाला निरुपम यांनी विरोध दर्शवला होता. यावेळेस ते असंही म्हणाले की, ''मुलांना राजकारणापासून दूर ठेवले पाहिजे. पंतप्रधान मोदींकडून शाळेतील विद्यार्थी काहीही शिकणार नाहीत. मोदींसारख्या अशिक्षित आणि अडाणी व्यक्तीच्या आयुष्यावर बनवण्यात आलेला लघुपट पाहून मुलं काय शिकणार आहेत?. पंतप्रधानांकडे किती डिग्री आहेत, हेदेखील लोकांना माहिती नाही''. असेही ते म्हणाले होते. 

 

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीMajid Memonमाजिद मेमनElectionनिवडणूकMuslimमुस्लीम