महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2025 19:04 IST2025-08-19T19:03:24+5:302025-08-19T19:04:01+5:30
देव यांनी या प्रकाराला वाचा फोडताच टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) च्या महिला खासदारांनी याचा निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी सुलता देव यांनी पीएमओला उद्देशून एक पोस्ट केली होती.

महिंद्राच्या कर्मचाऱ्याने महिला खासदाराला दिली अत्याचार, मारण्याची धमकी; कंपनी म्हणते...
बीजू जनता दलाच्या खासदार सुलता देव यांना महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्याने बलात्कार करून जिवे मारण्याची धमकी दिली आहे. सुलता देव यांनी याचे स्क्रीनशॉट व्हायरल करताच महिंद्रा कंपनीमध्ये खळबळ उडाली आहे. या कर्मचाऱ्याची चौकशी करून खरे असेल तर कारवाई करण्याचे कंपनीने म्हटले आहे.
देव यांनी या प्रकाराला वाचा फोडताच टीएमसी आणि शिवसेना (यूबीटी) च्या महिला खासदारांनी याचा निषेध केला आणि कठोर कारवाईची मागणी केली आहे. १७ ऑगस्ट रोजी सुलता देव यांनी पीएमओला उद्देशून एक पोस्ट केली होती. नाशिक येथील महिंद्रा कंपनीतील एका कर्मचारी आणि भाजप कार्यकर्त्याने एका महिला खासदाराला बलात्कार आणि हत्येची उघडपणे धमकी दिली. जर अशी परिस्थिती असेल तर कल्पना करा की ओडिशातील वंचित महिलांचे काय होत असेल, असा सवाल त्यांनी केला होता.
सत्यब्रत नायक या महिंद्रा कंपनीच्या कर्मचाऱ्याने त्यांना कमेंटमध्ये ही धमकी दिली होती. प्रकरण वाढल्याचे समजताच महिंद्रा ग्रुपने सोमवारी एक निवेदन जारी केले. आमच्या एका कर्मचाऱ्याने फेसबुकवर एका राजकीय नेत्याला काही अपमानास्पद आणि अनुचित संदेश पाठवल्याचे आम्हाला कळले आहे. महिंद्रा ग्रुपने नेहमीच मानवी प्रतिष्ठेला महत्त्व दिले आहे. आम्ही आदराचे वातावरण राखण्यावर विश्वास ठेवतो. या तत्त्वांचे उल्लंघन आम्ही सहन करत नाही. आम्ही हे प्रकरण खूप गांभीर्याने घेत आहोत आणि तात्काळ चौकशी सुरू केली आहे. जर आरोप खरे आढळले तर आमच्या आचारसंहिता आणि मूल्यांनुसार कठोर कारवाई करू, असे कंपनीने म्हटले आहे.