शहरं
Join us  
Trending Stories
1
लालपरीचा प्रवास महाग होणार का? एसटी तिकीट दराबाबत मंत्री प्रताप सरनाईकांनी दिली महत्वाची माहिती
2
Top Marathi News LIVE: लाडक्या बहिणींना ३००० रुपये, मोफत बस सेवा; पश्चिम बंगाल सरकारने घेतले मोठे निर्णय 
3
स्मार्टफोनमुळे कमी होतोय जन्मदर, रिलेशनशिप होत आहे अवघड; माणसाच्या आयुष्यावर मोठा परिणाम, नव्या संशोधनात काय?
4
दगडफेक केली, AC तोडले... लोकांच्या संतापाचा उद्रेक; गरिबांचे पैसे हडपल्याचा सरपंचावर आरोप
5
प्रेमानंद महाराजांची तब्येत बिघडली, पहाटेची पदयात्रा अनिश्चित काळासाठी स्थगित, भाविकांना दर्शन मिळणार नाही
6
जेव्हा सापाने खलनायकाच्या जिभेलाच दंश केला! शूटिंग सेटवर क्षणात पसरला 'सन्नाटा'; असा घडला होता थरार 
7
Twisha Sharma : "हे लोक खूप घाणेरडे, निर्दयी, माझ्या पोटात कोणाचं मूल..."; ट्विशाचं आईसोबत शेवटचं चॅट
8
"जगात असा एकही देश नाही, जेथे...!"; डच पंतप्रधानांच्या 'चिंते'ला भारताचं सडेतोड उत्तर
9
ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसशी हातमिळवणी केली असती तर TMC ला किती जागा मिळाल्या असत्या? आकडे बघून थक्क व्हाल
10
"तुम्ही शिकलात तर नोकरी मागाल, म्हणूनच सरकार..." NEET प्रकरणावर स्वामी अनिरुद्धाचार्यांचा घणाघात
11
अधिक मास विनायक चतुर्थीला अंगारक योग २०२६: ‘हे’ प्रभावी मंत्र-स्तोत्र म्हणा, संकटमुक्त व्हा!
12
"लोक फक्त फोटो काढत राहिले, पण तिने त्याची भूक ओळखली अन्..."; काळजाला भिडणारा Video
13
Adhik Maas 2026: विनायक चतुर्थीला अंगारक योग, ‘असे’ करा गणपती व्रत पूजन; दुपटीने शुभ-लाभ!
14
Travel : पैशांपेक्षा आनंदाला महत्त्व देणारा जगातील एकमेव देश! आयुष्यात एकदा तरी भेट द्यायलाच हवी
15
लखीमपूर खिरीत भीषण अपघात; ट्रक आणि मॅजिकची जोरदार धडक, १० जणांचा मृत्यू, ४ जखमी
16
नाकात नथ अन् कपाळी चंद्रकोर! कान्समध्ये अवतरली मदनमंजिरी, प्राजक्ता माळीने नऊवारीत दाखवला मराठी ठसका
17
Twisha Sharma: 'मी अडकलेय रे, पण तू अडकू नकोस', ट्विशाचा मीनाक्षीला मेसेज, त्यानंतर मृत्यूचीच बातमी आली; असं काय घडलं?
18
बचत करताना 'हे' लक्षात ठेवा, नाहीतर कष्टाची कमाई 'अशी' होईल बरबाद!
19
बेपत्ता मुलीच्या कुटुंबाच्या विनवण्या, पोलीस अधिकारी म्हणाले शोधण्यासाठी गाडीत 'डिझेल'च नाही; नागपूरमधील धक्कादायक प्रकार
20
Safest Cars: किया सेल्टोस ते टाटा पंच...,भारतातील सुरक्षित गाड्या; क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार!
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रीयन महिलाही रणी ठाकल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 9, 2019 02:29 IST

विज्ञान महोत्सव; महिला परिषदेत दबदबा

सीमा महांगडे 

कोलकाता : ‘महिलाही रणी ठाकल्या’ असे म्हणत पाचव्या भारतीय आंतरराष्ट्रीय विज्ञान परिषदेत महिला वैज्ञानिक व उद्योजिका यांच्यावर आयोजित २ दिवसीय परिषदेत महिला सक्षमीकरणाचे चित्र पाहायला मिळाले. विशेष म्हणजे शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या सत्रात महाराष्ट्रीयन महिलांचा दबदबा चर्चासत्रात आणि कामगिरी सादरीकरणात दिसून आला.

स्वकर्तृत्वावर, मेहनतीच्या व जिद्दीच्या बळावर हळूहळू स्वत:ची व समाजाची प्रगती साधणाºया महिलांच्या या सत्रात महाराष्ट्राच्या मेळघाटात समाजकार्य करणाºया निरुपमा देशपांडे, अकोलेच्या फूड मदर म्हणून ओळखल्या जाणाºया शेतकरी ममताबाई आणि हजारो शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यास हातभार लावणाºया पुण्याच्या स्मिता घैसास यांनी आपल्या कामाचे सादरीकरण केले. त्यामुळे इतर क्षेत्रांप्रमाणे विज्ञान आणि तंत्रज्ञान क्षेत्रातही महाराष्ट्रीयन महिलांनी आपला जोर दाखवून दिला.
महिला वैज्ञानिक व उद्योजिकांच्या दुसºया दिवशीच्या सत्रात साध्या राहणीमानातून प्रसिद्धीस आलेल्या आणि आज जगासाठी प्रेरणा ठरणाºया महिलांना वक्ते म्हणून मार्गदर्शनासाठी बोलावण्यात आले होते. महाराष्ट्रातील अहमदनगरमधील अकोले येथील ममताबार्इंनी तर सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. नऊवारी साडी आणि नाकात नथ असा पेहराव असलेल्या ममताबार्इंनी वर्मी ब्रीकेडचा (गांडूळ खतांच्या गोळ्या) वापर आणि मुळात त्याचे संशोधन कसे केले याची उकल सादरीकरणाद्वारे केली तेव्हा देशाच्या निरनिराळ्या कोपºयांतून आलेल्या उच्चशिक्षित महिलाही त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत राहिल्या. साधे नैसर्गिक पण समृद्ध जीवन माणूस कसे जगू शकतो हे ममताबार्इंच्या घरी गेल्यानंतर समजते. विशेष म्हणजे ममताबाई निरक्षर आहेत. पण त्यांचे पारंपरिक ज्ञान एवढे उच्च दर्जाचे आहे की, परसबाग पाहणीसाठी आलेल्या आयआयटीच्या विद्यार्थ्यांनाही त्या मोलाचे धडे देतात.

शेतीचे धडे देऊन ममताबाई महिला शेतकºयांना समृद्ध करत आहेत तर स्मिता घैसासही आपल्या कार्यातून गेल्या ३५ वर्षांपासून शेतकरी / महिलांना आर्थिक सक्षमता व संपन्नता मिळवून देण्याचे कार्य त्यांच्या सुयश चॅरिटेबलद्वारे करत आहेत. महाराष्ट्र, राजस्थान, ओडिशा, छत्तीसगड, मध्य प्रदेश व आसाम या राज्यांतील ३५०० पेक्षा जास्त गावांमध्ये कृषिविकासातून सुयशचे काम पोहोचले आहे.

 

टॅग्स :Womenमहिला