Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 3, 2019 06:03 IST2019-10-03T00:39:01+5:302019-10-03T06:03:01+5:30
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची दुसरी यादी प्रसिद्ध केली आहे.

Vidhan sabha 2019 : काँग्रेसकडून उमेदवारांची तिसरी यादी प्रसिद्ध
नवी दिल्ली/मुंबई - महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसने उमेदवारांची अजून एक यादी प्रसिद्ध केली आहे. दुसऱ्या यादीमध्ये एकूण 20 उमेदवारांचा समावेश असून, या यादीत काँग्रेसने काही विद्यमान आमदारांसह काही नव्या चेहऱ्यांना संधी दिली आहे. आज प्रसिद्ध करण्यात आलेल्या यादीत दीपक अत्राम (अहेरी), रवी राज देशमुख ( परभणी), अस्लम शेख (मालाड, पश्चिम), मधुकर चव्हाण (भायखळा), मनीषा सूर्यवंशी (घाटकोपर पश्चिम), सिद्धराम मेहेत्रे (अक्कलकोट), प्रभाकर पालोडकर (सिल्लोड), मोहन सिंह (नंदुरबार), चंद्रकांत जाधव (कोल्हापूर उत्तर), बंटी शेळके ( मध्य नागपूर), पुरुषोत्तम हजारे (पूर्व नागपूर) यांचा समावेश आहे. मात्र मुख्यमंत्र्यांविरोधात लढण्यासाठी दक्षिण पश्चिम मतदारसंघातून मात्र काँग्रेसने अद्याप उमेदवाराची घोषणा केलेली नाही.
यापूर्वी काँग्रेसने प्रसिद्ध केलेल्या यादीत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेक वरिष्ठ नेत्यांचा समावेश होता. दरम्यान, विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचे शेवटचे दोन दिवस उरले असून, उर्वरित उमेदवारांची यादी प्रसिद्ध करण्यासाठी पक्षाकडे मर्यादित वेळ उरला आहे.