नवी दिल्ली : देशात भ्रष्टाचार कमी करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकार अनेक उपाययोजना करत असताना भ्रष्टाचार कमी होण्याऐवजी वाढत आहे. २०२३ मध्येही महाराष्ट्र भ्रष्टाचारात देशात अव्वल ठरला असल्याचे केंद्र सरकारच्या एनसीआरबी अहवालातून समोर आले आहे. २०२३ मध्ये देशभरात भ्रष्टाचाराची ११३९ प्रकरणे समोर आली असताना त्यात महाराष्ट्राची तब्बल ७६३ प्रकरणे आहेत. या यादीत उत्तर प्रदेश दुसऱ्या क्रमांकावर आहे.
महाराष्ट्रात भ्रष्टाचाराची प्रकरणे कशी वाढत गेली?२०२१ - ७१५ २०२२ - ६८८ २०२३ - ७६३
सर्वाधिक भ्रष्टाचार कुठे? महाराष्ट्र ७६३ उत्तर प्रदेश २१६ हरयाणा ३९ आसाम ३१ जम्मू काश्मीर २७
भ्रष्टाचाराची प्रकरणे कोणत्या शहरांत समोर? कोइम्बतूर १६८ चेन्नई १३२ पुणे २८ नागपूर १२ मुंबई १२
राज्यानुसार आत्महत्या२०२३ मध्ये देशभरात एकूण २४,६७८ रेल्वे अपघातांमध्ये २१,८०३ लोकांचा मृत्यू झाला असून, महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये सर्वाधिक बळी गेले असल्याचे अहवालात म्हटले आहे.
महाराष्ट्रात आत्महत्यांचे प्रमाण देशात सर्वाधिकदेशात २०२३ मध्ये तब्बल १,७१,४१८ आत्महत्या झाल्या असून, २०२२ च्या तुलनेत हा आकडा ०.३ टक्क्यांनी वाढला आहे. ‘एनसीआरबी’च्या अहवालानुसार कौटुंबिक समस्या आणि आजारपण ही आत्महत्यांची दोन प्रमुख कारणे ठरली आहेत. या आत्महत्यांपैकी सर्वाधिक २२,६८७ आत्महत्या महाराष्ट्रात नोंदल्या गेल्या. प्रमुख पाच राज्यांमध्ये झालेल्या आत्महत्यांचा देशातील एकूण आत्महत्यांमध्ये जवळपास अर्धा म्हणजेच ४९ टक्के वाटा आहे.
वर्गवारीनुसार आत्महत्यावर्ग संख्या (%) गृहिणी २४,०४८ १४.० शासकीय कर्मचारी १,९१५ १.१ खासगी कर्मचारी १२,२७५ ७.२ सार्वजनिक उपक्रम २,३२७ १.४
Web Summary : Maharashtra leads India in corruption for the third consecutive year, with 763 cases registered in 2023. Pune has the highest number of bribery cases. The state also recorded the highest number of suicides, driven by family issues and illness, according to NCRB data.
Web Summary : महाराष्ट्र लगातार तीसरे वर्ष भ्रष्टाचार में भारत में सबसे ऊपर है, 2023 में 763 मामले दर्ज किए गए। पुणे में रिश्वतखोरी के सबसे अधिक मामले हैं। NCRB के आंकड़ों के अनुसार, पारिवारिक मुद्दों और बीमारी के कारण राज्य में आत्महत्याओं की संख्या भी सबसे अधिक है।