चंद्रशेखर बर्वे
नवी दिल्ली: भटक्या कुत्र्यांनी देशाभरात हैदोस घातला असून मागील ६ वर्षात तब्बल २ कोटी ७८ लाख लोकांचे लचके तोडले आहेत. महाराष्ट्रात २९ लाख लोकांना कुत्रे चावले. २०२१ ते २३ या तीन वर्षात कुत्रा चावण्याच्या सर्वाधिक घटना महाराष्ट्रात घडल्या. यापूर्वीच्या ३ वर्षात (२०१८ ते २०) तामिळनाडू देशात पहिल्या स्थानी होते.
दिल्लीतील कुत्री शहराबाहेर न्या; सुप्रीम कोर्टाचे आदेश
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. जे.बी. पारडीवाला आणि न्या. आर. महादेवन यांच्या खंडपीठाने एका बातमीची दखल घेत दिल्लीतील भटक्या कुत्र्यांना वस्त्यांपासून लांब शेल्टर होममध्ये घेऊन जाण्याचा आदेश दिला. कुत्र्यांचे अंगावर धावून जाणे आणि चावल्यानंतर रेबीजमुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण वाढत आहे. डी. वाय. चंद्रचूड सरन्यायाधीश असताना त्यांच्या कारकुनाला कुत्र्याने चावा घेतल्याच्या घटनेची खूप चर्चा झाली होती. भटक्या कुत्र्यांमुळेच उद्योगपती पराग देसाई यांचा मृत्यू झाला होता.
उत्तर प्रदेश देशात नंबर वन
यूपी ५३,४१,५९२ तामिळनाडू ३४,६०,८९९ महाराष्ट्र २९,६८,५९१ गुजरात २०,८०,०८० प. बंगाल १८,१९,८४५ आंध्रप्रदेश १७,३३,५१५ राजस्थान १५,६८,०६५ कर्नाटक १३,५६,२४२ तेलंगणा १३,२१,२२३ नवी दिल्ली २,४६,०९९