बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; देशात २.३३ लाख बनावट कंपन्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 23, 2024 07:03 IST2024-12-23T07:03:47+5:302024-12-23T07:03:55+5:30
सततच्या धडक कारवाईमुळे या कंपन्या समोर आल्या आहेत.

बोगस कंपन्यांमध्ये महाराष्ट्र आघाडीवर; देशात २.३३ लाख बनावट कंपन्या
हरीश गुप्ता
नवी दिल्ली : गेल्या पाच वर्षात रजिस्ट्रार ऑफ कंपनीजने (आरओसी) तब्बल २.३३ लाख बनावट कंपन्या बंद केल्या आहेत. यातील ३६,८५६ कंपन्या महाराष्ट्रातील आहेत. बोगस कंपन्यात महाराष्ट्र देशात आघाडीवर आहे. त्यानंतर ३५,६३७ बनावट कंपन्यासह दिल्ली क्रमांकावर आहे. दुसऱ्या गत पाच वर्षात २,३३,५६६ कंपन्यांना यादीतून काढून टाकण्यात आले आहे. याची सुरुवात २०१९-२० मध्ये ५९,९९५ कंपन्यांना यादीतून काढून झाली. तर, २०२२-२३ मध्ये ८२,१२६ कंपन्यांना यादीतून काढून टाकण्यात आले. २०२३-२४ मध्ये यादीतून काढलेल्या कंपन्यांची संख्या १६,४६५ होती. विशेष म्हणजे, पाचपैकी चार वर्षांत महाराष्ट्र यात अव्वल राहिला, सततच्या धडक कारवाईमुळे या कंपन्या समोर आल्या आहेत.
अनेकदा कंपन्यांवर धडक कारवाई
सरकार या कंपन्यांना बनावट कंपन्या म्हणून संबोधत नाही. परंतु, त्यांना निष्क्रिय म्हणून वर्गीकृत करते. ज्यांनी कोणताही व्यवसाय केला नाही किंवा गेल्या दोन आर्थिक वर्षामध्ये आर्थिक विवरणे आणि वार्षिक रिटर्न भरले नाहीत. वेळोवेळी अशा कंपन्यांवर धडक कारवाई करण्यात आली असल्याचे सांगण्यात आले.