शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
“कातळ शिल्पाचे समर्थन करणारे राज ठाकरे खरे की रिफानरीचे समर्थन करणारे”; ठाकरे गटाचा सवाल
3
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
4
मोदींना पाठिंबा देताच राज ठाकरेंची साथ सोडणारे कीर्तिकुमार शिंदे ठाकरे गटात, उद्धव ठाकरेंनी बांधलं शिवबंधन
5
IPL 2024 CSK vs PBKS : पंजाबने टॉस जिंकला! ऋतुराजची मिश्किल टिप्पणी; अखेर सँटनरची एन्ट्री
6
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
7
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
8
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
9
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
10
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
11
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
12
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
13
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
14
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
15
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
16
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
17
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
18
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
19
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
20
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या

महाराष्ट्र, हरियाणात आपला एक टक्काही मते नाहीत; तरीही चिंतेत आहे दिल्ली भाजपा

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2019 9:13 AM

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते.

नवी दिल्ली : महाराष्ट्रात भाजपा-शिवसेना युतीला स्पष्ट बहुमत मिळाले आहे. तसेच हरियाणामध्येही भाजपा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. तरीही दिल्लीच्या भाजपाला चिंतेने ग्रासले आहे. कारण दोन्ही राज्यांमध्ये जागा कमी झाल्या आहेत. 

भाजपाचे दिल्लीतील नेते मनोज तिवारी यांनी महाराष्ट्र आणि हरियाणामध्ये प्रचारसभा घेतल्या होत्या. महाराष्ट्रात मुंबईपुरता प्रभाव पडेल असे वाटत असले तरीही हरियाणाकडे जास्त लक्ष होते. मात्र, तिवारी यांच्या सभांचा काही उपयोग झालेला दिसत नाही. तसेच महाराष्ट्रात पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा यांनी ज्यांच्यासाठी सभा घेतल्या त्या नेत्यांना पराभवाची धूळ चाटावी लागली आहे. हरियाणामध्ये भाजपा बहुमताने जिंकेल अशी अपेक्षाही फोल ठरली आहे. यामुळे दिल्लीच्या कार्यकर्त्यांमध्ये निरुत्साह दिसू लागला असून त्यांनी आपच्या दोन्ही राज्यांतील कामगिरीला सोशल मिडीयावर ट्रोल करण्यास सुरूवात केली आहे. काल दिवसभर आपला ट्रोल केले जात होते. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पक्ष आप दोन्ही राज्यांमध्ये निवडणूक लढवत होता. या दोन्ही राज्यांमध्ये आपला 1 टक्केही मते मिळाली नाहीत. यावरून भाजपाच्या दिल्लीतील कार्यकर्त्यांनी आपला ट्रोल करण्यास सुरूवात केली होती. 

दिल्लीमध्ये येत्या फेब्रुवारीमध्ये निवडणूक होऊ घातली आहे. येथील नेत्यांना वाटत होते की, हरियाणामध्ये मोठा विजय मिळाला तर दिल्लीमध्ये आपची सत्ता उलथवण्यास मदत होईल. दिल्लीमध्ये भाजपाच्या बाजुने वातावरण तयार होईल. मात्र, दोन्ही राज्यांमध्ये भाजपाच्या जागा घटल्याने आणि नेत्यांच्या सभांना अपयश आल्याने दिल्लीतील कार्यकर्ते निराश झाले आहेत. शेजारच्या राज्यातील निकालांचा दिल्लीतील राजकारणावर परिणाम होण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे. यामुळेच भाजपाच्या नेत्यांनी या निकालांवरून आपला लक्ष्य करण्यास सुरूवात केली आहे. 

भाजपाच्या नेत्यांनी म्हटले की, दोन्ही राज्यांमध्ये आपचा एकही उमेदवार डिपॉझिट वाचवू शकला नाही. आपचे नेते मतदारांना मोफत योजनांचे आमिष दाखवत होते, मात्र त्यांना नाकारले. महाराष्ट्रात आपला 0.12 आणि हरियाणात 0.43 टक्के मते मिळाली. तर भाजपा या दोन्ही राज्यांमध्ये सरकार बनविणार आहे. जर हरियाणामध्ये अशी हालत असेल तर दिल्लीत काय होईल असा टोलाही या नेत्यांनी लगावला आहे. 

टॅग्स :Maharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019haryana election 2019हरियाणा निवडणूकAAPआपBJPभाजपाNew Delhiनवी दिल्लीArvind Kejriwalअरविंद केजरीवाल