चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 01:19 PM2021-08-27T13:19:42+5:302021-08-27T13:21:28+5:30

दीक्षा शिंदे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याचं वृत्त मध्यंतरी समोर आलं होतं. या प्रकरणावर NASA नं दिलं स्पष्टीकरण.

maharashtra girl diksha shinde nasa panel selection was based on false information all you need to know | चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण?

चुकीच्या माहितीच्या आधारे महाराष्ट्रातील विद्यार्थिनीची NASA मध्ये झाली होती निवड; पाहा काय आहे प्रकरण?

Next
ठळक मुद्देदीक्षा शिंदे या दहावीत शिकणाऱ्या विद्यार्थिनीची नासाच्या फेलोशिप पॅनलवर निवड झाल्याचं वृत्त मध्यंतरी समोर आलं होतं.दीक्षाची निवडीबाबत नासाकडून देण्यात आलं स्पष्टीकरण

दहावीतील विद्यार्थिनी दीक्षा शिंदेची नासा (NASA ) या जगप्रसिद्ध या अमेरिकन अंतराळ संशोधन संस्थेत एमएसआय या फेलोशिप व्हर्च्युअल पॅनलवर पॅनलिस्ट म्हणून निवड झाली असल्याचं वृत्त समोर आलं होतं. दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा लेख नासाला पाठवला होता. परंतु यावर आता नासानं स्पष्टीकरण दिलं असून तिला फेलोशिप देण्यात आली नसल्याचं स्पष्ट केलं आहे. तसंच तिची निवड थर्ड पार्टीनं दिलेल्या चुकीच्या माहितीच्या अधारावर देण्यात आल्याचंही नासानं म्हटलं आहे.

 दीक्षाने ‘ब्लॅक होल्स अँड गॉड’ हा संशोधनपर पेपर मे २०२१ मध्ये नासाला पाठवला होता. तसंच त्याच धर्तीवर अल्पसंख्याक सेवा संस्थेच्या फेलोशिपच्या व्हर्च्युअल पॅनलिस्ट म्हणून आपली निवड झाल्याचा दावा दीक्षा शिंदे हीनं केला होता. त्यासाठी नासाकडून मानधनही मिळत असल्याचं तिनं सांगितलं होतं. परंतु काही जणांनी यानंतर उपस्थित केलेल्या शंकेनंतर एएनआय या वृत्तसंस्थेनं नासाशी ईमेल द्वारे संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. 'दीक्षा शिंदे हीची नासाच्या कोणत्याही पॅनलवर नियुक्त करण्यात आलं नसून तिला मानधन देण्यात येणार नाही,' असं ईमेलला उत्तर देताना नासाच्या कॅटरिन ब्राउन यांनी सांगितलं. 

पॅनलिस्टची निवड करण्याची प्रक्रिया तिसऱ्या पक्षाकडून होते. दीक्षाबाबत देण्यात आलेल्या चुकीच्या माहितीच्या आधारे ही निवड करण्यात आली होती. यासाठी केवळ अमेरिकेचेच नागरिक पात्र आहेत. दीक्षाचा पेपर स्वीकारण्यात आलेला नसून तिच्या अमेरिकेच्या प्रवासाचा खर्चही नासा करण्याचा दावा चुकीचा असल्याचं ब्राउन यांनी इमेलद्वारे म्हटलं आहे. या प्रकरणी आता पुढील तपास नासाच्या महानिरिक्षक कार्यालयाद्वारे करण्यात येणार आहे. 

काय आहेत फेलोशिपचे नियम?
नासाच्या मायनॉरिटी इन्स्टीट्यूशन फेलोशिपसाठी काही नियम तयार करण्यात आले आहेत. यामध्ये केवळ अमेरिकन नागरिकच अर्ज करू शकतात. ज्यांनी विज्ञान, गणित, तंत्रज्ञान अशा विषयांमध्ये ग्रॅज्युएशन केलं आहे आणि १ सप्टेंबरपासून मास्टर्स प्रोग्राममध्ये दाखला घेतला आहे, तेच यासाठी अर्ज करू शकतात. 

Web Title: maharashtra girl diksha shinde nasa panel selection was based on false information all you need to know

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.