शहरं
Join us  
Trending Stories
1
आमचा पक्ष काँग्रेसच, पण सांगलीत चिन्ह चोरीला गेले; विशाल पाटील यांची ‘लोकमत’ला मुलाखत
2
राहुल गांधींच्या वक्तव्यामुळे २०० विद्यापीठांचे कुलगुरू संतप्त, कारवाईची मागणी
3
उपमुख्यमंत्र्यांनी काँग्रेसच्या नगरसेवकाला मारली थप्पड, भाजपाने शेअर केला व्हिडीओ 
4
स्टेशन मास्तरला लागली डुलकी, मिळाला नाही सिग्नल, स्टेशनवर खोळंबली ट्रेन, ड्रायव्हर हॉर्न वाजवून दमला, अखेर...
5
१५ हजार सॅलरी, १० हजारांची लाच अन् घरी सापडले ३० कोटी; वाचा इनसाईड स्टोरी
6
स्वामी समर्थ पुण्यतिथी: स्वामीपूजनानंतर आवर्जून म्हणा, श्री स्वामी समर्थ महाराजांची आरती
7
सडलेला तांदूळ, खराब नारळ, लाकडाचा भूसा, केमिकलने बनवायचे मसाले, 'असा' झाला पर्दाफाश
8
स्वामी समर्थ पुण्यतिथी: शेकडो वर्षे लोटली, स्वामी आजही समस्त भक्तांच्या पाठीशी आहेत!
9
मी राजकारणातील सासू, तर अर्जुनराव हे माझी सून; रावसाहेब दानवे यांची टोलेबाजी
10
अक्षय्य तृतीयेला २ राजयोग: ६ राशींना लाभच लाभ, येणी मिळतील; नोकरीत संधी, लक्ष्मी शुभ करेल!
11
SBI मधून २० वर्षांसाठी ₹३० लाखांचं घ्याल Home Loan? किती असेल EMI, किती द्याल व्याज, पाहा
12
खुद्द अजित पवार उभे असते, तर... ; सुनेत्रा पवारांवरून सुप्रिया सुळेंचे महत्वाचे वक्तव्य
13
Godrej Family Tree: गोदरेज समूहाची 'अशी' झालेली सुरुवात, पाहा आज कुटुंबात कोण-कोण सांभाळतंय व्यवसाय?
14
'त्यात चुकीचं काय?' साडी नेसण्यावरुन ट्रोल झाल्यानंतर ओंकार भोजनेने दिलं उत्तर
15
लोकसभा निवडणुकीनंतर राज्यातील २ पक्षांचं अस्तित्व संपेल; पृथ्वीराज चव्हाणांचा दावा
16
२६/११ हल्ला: कसाब आणि हेमंत करकरे आमने-सामने आले तेव्हा नेमकं काय घडलं? आरोपपत्रात नोंद आहे सर्व घटनाक्रम  
17
राजकारण राजकारणाच्या जागी, नाते नात्याच्या जागी; सुनेत्रा पवारांची बारामतीवर उत्तरे...
18
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची तेजीसह सुरुवात; कोटक बँकेत तेजी, टायटन आपटला
19
नोकराच्या घरी सापडलं कोट्यवधीचं घबाड; ऐन निवडणुकीत ED च्या कारवाईनं मोठी खळबळ
20
अमेठीत गोंधळ, काँग्रेस कार्यालयाबाहेर अनेक वाहनांची तोडफोड, भाजपावर आरोप

ब्रेकिंगः सत्तास्थापनेबाबत सोनियांशी चर्चाच नाही, शरद पवारांकडून शिवसेना पुन्हा 'गॅसवर'

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 6:44 PM

सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली.

नवी दिल्ली - राज्यातील सत्तास्थापनेबाबत दिल्लीत मोठी घडामोड घडली आहे. सोनिया गांधी आणि शरद पवार यांच्यात जवळपास ४५ मिनिटे बैठक झाली. या बैठकीनंतर शरद पवारांनी पत्रकार परिषद घेत सरकार बनविण्याबाबत आमची कोणतीही चर्चा झाली नाही. ही काँग्रेस-राष्ट्रवादीबाबत बैठक होती. त्यामुळे इतर कोणत्याही पक्षाबाबत बैठकीत चर्चाच झाली नाही असं सांगत शरद पवारांनी शिवसेनेला पुन्हा गॅसवर ठेवलं आहे. 

यावेळी बोलताना शरद पवार म्हणाले की, सोनिया गांधी यांच्यासोबत आमची बैठक झाली. महाराष्ट्राच्या सध्याच्या परिस्थितीवर सविस्तर चर्चा झाली. या चर्चेदरम्यान अहमद पटेलदेखील उपस्थित होते. ही चर्चा झाल्यानंतर काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक होईल. याबाबत पक्षातील नेत्यांची मतं जाणून घेणार आहोत. महाराष्ट्रातील परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहोत असं त्यांनी सांगितले. 

दरम्यान, आम्हाला राज्यपालांनी सहा महिन्याचा अवधी दिलेला आहे. शिवसेनेनं १७० आमदारांचा आकडा कुठून आणला याची कल्पना नाही, हा प्रश्न शिवसेना नेत्यांना विचारा असं पवार म्हणाले मात्र पत्रकारांनी सांगितलं की, काँग्रेस-राष्ट्रवादी आमच्यासोबत आहे असा दावा शिवसेना करतंय त्यावर पवारांनी आम्ही सगळ्यांसोबत आहोत. तुम्ही त्यांनाच विचारा हा आकडा कुठून आला? किमान समान कार्यक्रम ठरविण्याबाबत आम्ही काहीच बोललो नाही असं सांगत राज्यातील सत्तास्थापनेबाबत सस्पेन्स कायम ठेवला आहे. 

आघाडीच्या मित्रपक्षांना विचारात घ्यावं लागेलबैठकीत कोणत्याही पक्षासोबत सरकार बनविण्यावरुन चर्चा झाली नाही. जे संख्याबळ आहे त्याबाबत चर्चा झाली. आमच्यासोबत समाजवादी पार्टी, स्वाभिमान शेतकरी संघटना, कवाडे गट अशा अनेक संघटना आघाडीत होत्या. आघाडीतल्या मित्रपक्षांना नाराज करु शकत नाही. जे लोकं आमच्यासोबत निवडणुकीत होते त्यांना विचारात घ्यावं लागणार आहे असंही शरद पवारांनी सांगितले. 

सभागृहाची प्रतिमा जपायला हवी राज्यसभेच्या महत्वाची बाब म्हणून संसदेत चर्चा झाली. सभागृहाची प्रतिमा जपण्यावर भाष्य झालं. त्यात पंतप्रधानांनी राष्ट्रवादीचं कौतुक केलं. मी इतकी वर्ष विधानसभा, राज्यसभा, लोकसभा पाहिली. पण विरोध करण्यासाठी मी कधी वेलमध्ये आलो नाही. सभागृहाची प्रतिमा जपायला हवी असं मत पवारांनी मांडलं.   

 

टॅग्स :Sharad Pawarशरद पवारSonia Gandhiसोनिया गांधीShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019