Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2019 06:36 AM2019-11-14T06:36:36+5:302019-11-14T06:38:35+5:30

महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती.

Maharashtra Election, Maharashtra CM: It was announced that Fadnavis will be the Chief Minister | Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

Maharashtra CM: ''फडणवीस मुख्यमंत्री होतील, असे जाहीरच केले होते''

googlenewsNext

नवी दिल्ली : महाराष्ट्रात महायुती जिंकेल आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा मुख्यमंत्री होतील, अशीच आमची भूमिका होती. पंतप्रधान मोदी व मी तसे जाहीर केले होते. असे असताना दोघांकडे निम्मा-निम्मा काळ मुख्यमंत्रिपद असावे, ही मागणी शिवसेनेने नंतर केली. ती आम्हाला मान्य नव्हती, असे भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी स्पष्ट केले.
फडणवीसच मुख्यमंत्री होतील, असे आम्ही घोषित केले, तेव्हा शिवसेनेने आक्षेप घेतला नाही, असे सांगून शहा म्हणाले की, शिवसेनेने बदललेली भूमिका मान्य करणे शक्यच नव्हते. राष्ट्रपतींनी बहुमत दाखवून देण्यासाठी पुरेसा वेळ दिला नाही, ही टीका चुकीची आहे. राज्यात १८ दिवसांत बहुमत दाखवून सत्तास्थापनेचा दावा करणे शक्य होते. कोणालाच ते शक्य नसल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांनी राष्ट्रपतीची शिफारस केली. आताही राष्ट्रपती राजवट असली, तरी पक्ष वा पक्षांची आघाडी राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा करू शकते.
>ती आमची संस्कृती नाही 
तुम्ही व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यात निवडणुकांच्या आधी काय ठरले होते, या प्रश्नावर भाजप अध्यक्ष म्हणाले की, अशा बंद दाराआड काय चर्चा होते, हे सांगायचे नसते. ती आमची संस्कृती नाही.

Web Title: Maharashtra Election, Maharashtra CM: It was announced that Fadnavis will be the Chief Minister

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.