शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

महाकुंभ चेंगराचेंगरीत 15000 लोकांचे नातेवाईक बेपत्ता; सपा खासदाराचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 4, 2025 17:32 IST

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत.

Mahakumbh Stampede: प्रयागराजमध्ये आयोजित महाकुंभात 29 जानेवारीच्या रात्री झालेल्या चेंगराचेंगरीनंतर विरोधक सातत्याने केंद्र आणि राज्य सरकारवर टीका करत आहेत. संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातही हा मुद्दा उपस्थित केला जातोय. दरम्यान, समाजवादी पक्षाचे राज्यसभा खासदार राम गोपाल यादव यांनीदेखील महाकुंभातील चेंगराचेंगरीचा मुद्दा उपस्थित करत मोठा दावा केला. 

महाकुंभ चेंगराचेंगरीवर संसदेत झालेल्या निदर्शनेनंतर समाजवादी पक्षाचे खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी दावा केला की, या घटनेनंतर 15,000 लोकांनी त्यांचे कुटुंबीय बेपत्ता असल्याची तक्रार केली आहे. या बेपत्ता व्यक्तींबाबत कोणतेही अपडेट किंवा माहिती सरकार देत नसल्याबद्दल यादव यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे.

15,000 बेपत्ता वृत्तसंस्था एएनआयशी बोलताना सपा खासदार राम गोपाल यादव यांनी मंगळवारी सांगितले की, चेंगराचेंगरीच्या घटनेनंतर 15,000 लोकांनी आपले नातेवाईक बेपत्ता असल्याच्या तक्रारी दिल्या. पण, सरकार याबाबत कोणतीही माहिती द्यायला तयार ​​नाही. 1954 मध्ये प्रयाग कुंभमेळ्यात झालेल्या चेंगराचेंगरीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी संसदेत बोलताना या दुर्घटनेत मृत्युमुखी पडलेल्या आणि जखमी झालेल्या लोकांची संख्या सांगितली होती.

याउलट उत्तर प्रदेशचे विद्यमान मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे प्रशासन व्हीआयपींसाठी व्यवस्था करण्यात व्यस्त आहे. त्यांना सर्वसामान्यांची चिंता अजिबात चिंता नाही. मुख्यमंत्री रोज कुंभमेळ्यात हजर असतात. सर्व अधिकारी व्हीआयपी लेनची देखभाल करण्यात व्यस्त असतात. सर्वसामान्य लोक मरतात, याची त्यांना फिकीर नाही, अशी टीकाही सपा खासदार राम गोपाल यादव यांनी केली. 

विरोधकांची कारवाईची मागणी सोमवारी विरोधकांनी संसदेत अर्थसंकल्पीय अधिवेशनाचे कामकाज उधळून लावले. 29 जानेवारी रोजी झालेल्या चेंगराचेंगरीत 30 जणांचा मृत्यू झाला, त्यावर तातडीने चर्चा करण्याची मागणी त्यांनी केली. समाजवादी पक्षाचे प्रमुख आणि उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी सोमवारी यूपी सरकारवर टीका केली आणि मौनी अमावस्येदरम्यान झालेल्या महाकुंभ चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांची यादी जाहीर न केल्याबद्दल सरकारला फटकारले. बिजू जनता दलाच्या (बीजेडी) सदस्या सुलता देव यांनीदेखील मृत आणि बेपत्ता भाविकांचा डेटा शोधण्यात सरकारच्या असमर्थतेवर प्रश्न केला. तसेच, या घटनेवर सभागृहात अल्पकालीन चर्चेची मागणी केली. 

टॅग्स :Samajwadi Partyसमाजवादी पार्टीKumbh Melaकुंभ मेळाUttar Pradeshउत्तर प्रदेशBJPभाजपा