महाकुंभमेळ्यातील आगीत २५ टेंट जळून खाक; वर रेल्वेचे पूल, खाली तीन सिलिंडरचा स्फोट
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2025 19:12 IST2025-01-19T19:11:09+5:302025-01-19T19:12:18+5:30
अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांचे संयुक्त शिबिर होते. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे गीता प्रेस गोरखपूरचे विश्वस्त कृष्ण कुमार खेमका यांनी सांगितले.

महाकुंभमेळ्यातील आगीत २५ टेंट जळून खाक; वर रेल्वेचे पूल, खाली तीन सिलिंडरचा स्फोट
महाकुंभात लागलेल्या भीषण आगीत २५ टेंट जळून खाक झाले आहेत. परंतू, जवळपास २०० टेंट आगीच्या भक्ष्यस्थानी पडल्याचे सांगितले जात आहे. जेवण बनवत असताना आग लागली आणि आजुबाजुच्या टेंटमधील तीन सिलिंडरचा स्फोट झाला. अग्निशमन दलाने आग विझविली आहे.
अखिल भारतीय धर्म संघ आणि गीता प्रेस यांचे संयुक्त शिबिर होते. पश्चिम सीमेवरील क्षेत्राला परिभ्रमण क्षेत्र घोषित करण्यात आले आहे. प्रशासनाने तो परिसर कोणाला दिला आहे हे मला माहित नाही, त्या बाजूने काहीतरी आगीचे लोळ आमच्या बाजूला आले. काहीही शिल्लक राहिले नाही. देवाच्या कृपेने कोणतीही जीवितहानी झाली नाही, असे गीता प्रेस गोरखपूरचे विश्वस्त कृष्ण कुमार खेमका यांनी सांगितले.
आग लागल्याचे समजताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी योगी आदित्यनाथांना फोन करून याची माहिती घेतली. घटनास्थळी काही गाद्या, जॅकेट इत्यादी पाठवण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. सर्व तंबू बुक केलेले आहेत. यामुळे जळालेल्या तंबूतील लोकांची व्यवस्था कुठे करायची हा प्रश्न प्रशासनाला सतावत आहे.
जिथे आग लागली त्यावरून ट्रेनचा मार्ग आहे. गर्दीमुळे अग्निशमन दलाला पोहोचण्यास वेळ लागला. संपूर्ण महाकुंभमेळ्यात अलर्ट जारी करण्यात आला होता. एका व्यक्तीने पेटलेला सिलिंडर गंगा नदीमध्ये फेकला. यामुळे पुढील हानी टळली.