'हर हर गंगे'... आजपासून महाकुंभ, 'शाही स्नाना'ने सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2025 09:03 IST2025-01-13T09:02:47+5:302025-01-13T09:03:23+5:30
MahaKumbh 2025: गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगमावरील या महाकुंभमेळ्याला ३५ कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.

'हर हर गंगे'... आजपासून महाकुंभ, 'शाही स्नाना'ने सुरुवात
MahaKumbh 2025: लखनऊ/प्रयागराज (उत्तर प्रदेश) : मानवांचा जगातील सर्वात मोठा मेळावा म्हणून ओळखला जाणारा ४५ दिवसांचा कार्यक्रम म्हणजेच महाकुंभ मेळा... हा मेळा सोमवारपासूनच्या ‘पौष पौर्णिमेला’ ‘शाही स्नाना’ने सुरू होणार आहे. येथील गंगा, यमुना आणि सरस्वती नद्यांचा संगमावरील या महाकुंभमेळ्याला ३५ कोटी भाविक येण्याची अपेक्षा आहे.
उत्तर प्रदेशचे मुख्य सचिव मनोजकुमार सिंह यांनी सांगितले की, मौनी अमावास्येच्या काळात, चार ते पाच कोटी भाविक उत्सवात सहभागी होतील. ४५ दिवस चालणाऱ्या या महाकुंभचे राज्याचे बजेट सुमारे ७,००० कोटी रुपये आहे. मागील कुंभ स्वच्छतेसाठी प्रसिद्ध होता. या वेळचा कुंभ स्वच्छता, सुरक्षा आणि डिजिटल कुंभ आहे. २०१९ च्या कुंभमेळ्यात २४ कोटी भाविक आले होते.
भव्य मंडप, आलिशान तंबू
महाकुंभ मेळ्यासाठी पर्यटन मंत्रालय सज्ज झाले आहे. पर्यटन मंत्रालयाने अनेक शहरांमधून प्रयागराजला हवाई संपर्क वाढविण्यासाठी अलायन्स एअरशी भागीदारी केली आहे. येथे ५००० चौरस फूट ‘अतुल्य भारत मंडप’ उभारला आहे.