शहरं
Join us  
Trending Stories
1
"गजब भयो रामा जुलम भयो रे..."; बंगालमध्ये 'मुर्शिद ते मोदी' अन् 'मदीना ते कृष्णा'; निकालानंतर धून तीच बोल नवीन...! - VIDEO 
2
ठाणे, कल्याण डोंबिवलीत वादळी वारे, धुळीचे लोट; DCM शिंदेंच्या हेलिकॉप्टरचे 'इमर्जन्सी लँडिंग'
3
तामिळनाडूमध्ये राज्यपाल विरोधाचा दुसरा अंक! विजय दुसऱ्यांदा माघारी परतला; कार्यकर्ते संतापले
4
Mumbai Watermelon Case : ना कलिंगड, ना बिर्याणी...पायधुनीतील 'त्या' चौघांच्या मृत्यूचं खरं कारण अखेर समोर!
5
कोण आहेत तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र आर्लेकर? बहुमत असून सत्तास्थापनेत पेच; देशाचे लागले लक्ष
6
नुसतं सोनंच नाही, तर खाणीतून सोनं काढणंही महागलं! इराण युद्धामुळे डिझेल-स्फोटकांचे दर भडकले; पाहा काय आहे गणित
7
मोठी बातमी! नांदेड ग्रामीण पोलिसांनी उद्ध्वस्त केला शस्त्रांचा महाअड्डा; तब्बल ४,७९६ शस्त्रे जप्त
8
बाप रे! काव्या मारनच्या SRH संघाचा कर्णधार पॅट कमिन्सला ११३ कोटींची ऑफर; मेगा डीलसाठी तो IPL सोडणार?
9
४० रोडरोमिओंना अद्दल घडवणारी लेडी सिंघम; सरपंचाची लेक झाली धडाकेबाज IPS ऑफिसर
10
“विद्यार्थ्यांची फसवणूक करणाऱ्या संस्थांवर फौजदारी गुन्हे दाखल करा”: चंद्रकांत पाटील
11
चिराग पासवान यांनी मांडली वेगळी चूल...! पंजाबमध्ये सर्व जागा लढविण्याची घोषणा
12
यंदा शनि जयंती कधी आहे? दर्श भावुका अमावास्या अन् सौभाग्य योग; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
Mumbai Watermelon Case: कलिंगड प्रकरणात नवा ट्विस्ट, चौघांचा बुचकळ्यात टाकणारा 'ब्लड रिपोर्ट'; काय समोर आलं?
14
ऑपरेशन सिंदूरदरम्यान, पाकिस्तानचे ११ तळ उडवले, १३ विमाने पाडली, तसेच..., वर्षभरानंतर तिन्ही सैन्यदलांनी आकडाच सांगितला    
15
IPL 2026: युनिव्हर्स बॉस ख्रिस गेलचा 'तो' विक्रम इतिहासजमा, पंजाबच्या कूपर कॉन्लीची रेकॉर्ड ब्रेक इनिंग!
16
भयंकरच घडलं! सात वर्षांपूर्वी केला होता प्रेमविवाह; सिरीशाला पतीने रिक्षा स्टॅण्डवरच संपवले 
17
तमिळनाडूत सस्पेन्स संपला! 'विजय' सरकारला राज्यपालांचा हिरवा कंदील; जाणून घ्या कधी होणार शपथविधी
18
देशातील १३ राज्यांत वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; ताशी ६० किमी वेगाने वाहणार वारे
19
Astro Tip: पैशांची कमतरता भासतेय? शुक्रवारी आवर्जून करा 'हे' ५ उपाय; लक्ष्मी होईल प्रसन्न 
20
क्रिकेट विश्वावर शोककळा! विराट कोहलीचा जुना सहकारी अमनप्रीत सिंग गिलचे वयाच्या ३६ व्या वर्षी निधन
Daily Top 2Weekly Top 5

महादुला रामटेक.... विज्ञान प्रदर्शन

By admin | Updated: December 22, 2014 23:11 IST

विद्यार्थ्यांनी मांडल्या १५४ प्रतिकृती

विद्यार्थ्यांनी मांडल्या १५४ प्रतिकृती
रामटेक तालुका विज्ञान प्रदर्शनाची सांगता
महादुला (रामटेक) : परिसरातील मुसेवाडी येथील मातोश्री काशीदेवी विद्यालयात तालुका विज्ञान प्रदर्शनाचे नुकतेच आयोजन करण्यात आले. या विज्ञान प्रदर्शनात विविध शाळांच्या विद्यार्थ्यांनी १५४ प्रतिकृती सादर केल्या. कार्यक्रमाचे उद्घाटन आ. डी.एम. रेड्डी यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी पंचायत समिती सभापती किरण धुर्वे होत्या. यावेळी उपसभापती प्रणाली सरोदे, जि.प. सदस्य शोभा झाडे, दुर्गा सर्याम, शांता कुमरे, पं. स. सदस्य चौलीवार, हरिसिंग सरोते, कल्पना गोंगले, छाया वंजारी, सोहनलाल यादव, सरपंच बद्रिनाथ साळवे, प्रभारी गटशिक्षणाधिकारी सोनिया यादव, ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी भास्कर झोडे, मुख्याध्यापक नरेंद्र फाले आदी उपस्थित होते.
या विज्ञान प्रदर्शनात तालुक्यातून १५४ प्रतिकृती ठेवण्यात आल्या. यात आदिवासी गटात प्रॉव्हिडन्स स्कूल मनसरच्या नीरज जाधव यांच्या ट्रेनपासून वीजनिर्मिती प्रतिकृतीने प्रथम क्रमांक पटकावला. श्रीराम प्राथमिक शाळा वाहीटोला येथील नितीन जनबंधू यांच्या स्वच्छ गावाला द्वितीय, तर श्रीराम विद्यालय रामटेकच्या हिमांशू डडुरे, हर्षल लोखंडे यांच्या युझन्स टेक्नॉलॉजीला तृतीय पुरस्कार प्रदान करण्यात आला.
बिगर आदिवासी माध्यमिक गटात श्रीराम विद्यालयाचा रोहित चरडे, राहुल मानकर यांची प्रतिकृती प्रथम, समर्थ विद्यालय रामटेकचा राहुल शेळके याच्या जनरेटींग इलेक्ट्रिसिटी फॉर्म रेल्वे रनिंग व्हील या प्रतिकृतीस द्वितीय, मुसेवाडी विद्यालयातील अभिषेक टेंभुर्णे यांच्या सिक्रेट कार पार्किर्ंगला तृतीय बक्षिसाने गौरविण्यात आले.
आदिवासी प्राथमिक गटात अंकित काळे प्रथम, हिवराबाजार शाळेची कल्याणी बमनोटे द्वितीय, व प्रकाश हायस्कूल कांद्रीच्या अर्पिता मेश्राम हिने तृतीय क्रमांक पटकावला. बोथियापालोराच्या अर्पणा भलावी प्रथम, शांतीनिकेतन स्कूलचा प्रतीक चव्हाण द्वितीय तर नवजीवन हायस्कूल पथरईच्या चेतन गुडेश्वर याच्या प्रतिकृतीस तृतीय क्रमांक देण्यात आला.
शिक्षकांच्या प्रतिकृतीत माध्यमिक गटात उल्हास इटनकर, प्राथमिक गटात रामेश्वर थोटे, प्रयोगशाळा परिचर गटात के.एस. पगाडे, सचिन चव्हाण, लोकसंख्या शिक्षण गटात सुनील वेळेकर यांच्या प्रतिकृतींची निवड करण्यात आली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी विविध सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. कार्यक्रमाचे संचालन दीपक गिरधर यांनी तर आभार फाले यांनी मानले. (वार्ताहर)