Maha Kumbh 2025 ( Marathi News ) : देश-विदेशातील कोट्यवधी भाविकांचे प्रयागराज भूमीवर कोणत्याही आवाहनाशिवाय किंवा निमंत्रण न देता ज्या कारणाने आगमन होते, ते निमित्त म्हणजे महाकुंभमेळा. महाकुंभ मेळाला सुरुवात झाली आहे. जगातील कानाकोपऱ्यातून लोक या महाकुंभ मेळासाठी उपस्थित झाले आहेत, महाकुंभात आलेल्या साधुंच्या व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दरम्यान, आयआयटीयन बाबा देखील अचानक प्रसिद्धीच्या झोतात आले आहेत. या बाबांनी आयआयटी मुंबईतून इंजिनिअरिंग पूर्ण केले आहे, सोशल मीडियावर यांचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.
श्रीरामांची मोहिनी कायम, १ वर्षांत राम मंदिराचे ६ जागतिक विक्रम; तुम्हालाही वाटेल अभिमान
आयआयटीयन बाबांची न्यूज १८ या वृत्तवाहिनीने मुलाखत घेतली आहे. ही मुलाखत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या मुलाखतीमध्ये त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. यावेळी त्यांनी आयआयटी मुंबईमधून अभियांत्रिकी केली असल्याचे सांगितले. त्या बाबांचे नाव अभय सिंह आहे,त्यांनी स्वत: याबाबत मोठा खुलासा केला.
आयआयटी मुंबईमधून इंजिनिअरिंग पूर्ण
प्रयागराजमध्ये माध्यमे साधूंच्या मुलाखती घेत आहे. न्यूज १८ चे प्रतिनिधी एका बाबांची मुलाखत घेत होते, यावेळी त्यांना त्या बाबांच्या भाषेवरुन संशय आला. यावेळी त्या प्रतिनिधींनी तुम्ही चांगले बोलता यावरुन तुम्ही सुशिक्षीत असल्याचे दिसताय, असं म्हणाले. यावर उत्तर देताना बाबा म्हणाले की, हो मी आयआयटी बॉम्बेमधून एरोस्पेस इंजिनिअरिंग केले आहे.
यावेळी त्या बाबांना तुम्ही सन्यास का घेतला? असा प्रश्न उपस्थित केला. यावर ते बाबा म्हणाले, ही सर्वोत्तम परिस्थिती आहे. ज्ञानाचा पाठलाग करत राहा, पुढे जात राहा, तुम्ही किती दूर जाल? तुम्ही परत इथे येशीला, असंही ते म्हणाले.
बाबा म्हणाले की, मी मूळचा हरयाणाचा आहे. जन्मस्थान हरयाणाचा आहे, पण अनेक शहरांमध्ये राहिलो आहे. आयआयटी मुंबईमध्ये ४ वर्षे शिक्षण घेतल्यानंतर फोटोग्राफीची आवड निर्माण झाली. ३ इडियट्स चित्रपटाप्रमाणे, अभियांत्रिकीनंतर फोटोग्राफीमध्ये करिअर करायचे होते. या काळात १ वर्ष भौतिकशास्त्राचे प्रशिक्षणही घेतले. कला शाखेत पदव्युत्तर शिक्षण घेतल्यानंतर फोटोग्राफीला सुरुवात केली. जेव्हा मला तेही करायचे नव्हते तेव्हा मी सर्व काही सोडून संन्यास शिकायला सुरुवात केली.