Madhya Pradesh: शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, भाविकांची दूध घेऊन गर्दी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2022 19:23 IST2022-03-05T19:23:27+5:302022-03-05T19:23:57+5:30
आपला नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी-दूध पाजण्यासाठी पुढे जात.

Madhya Pradesh: शिवमंदिरात नंदी पाणी पित असल्याची अफवा, भाविकांची दूध घेऊन गर्दी
इंदौर - मध्य प्रदेशच्या आलीराजपूर येथे शनिवारी दुपारी अचानक शिव मंदिरात भाविकांची मोठी गर्दी जमा झाली. या मंदिरातील नंदी पाणी पित असल्याची अफवा गावभर पसरली. त्यानंतर, भाविकांनी दूध घेऊन मंदिरात धाव घेतली. विशेष म्हणजे या नंदी महादेवाला पाणी आणि दूध पाजण्यासाठी मंदिरात मोठी रांग लावली. आपला नंबर आल्यानंतर ते नंदीला पाणी-दूध पाजण्यासाठी पुढे जात.
शहरातील पंचेश्वर महादेव मंदिर, सर्वेश्वर महादेव मंदिर आणि शहरातील इतरही शिव मंदिरात भक्तानी पाणी व दूध घेऊन गर्दी केली आहे. नंदीच्या मुखाजवळ चमच्यात भरलेल पाणी हळु हळु कमी होत असून हा परमेश्वराचा चमत्कारच असल्याचं मत काही भाविकांनी व्यक्त केलं आहे. या अफवेनंतर खंडवा, इंदौर, मंदसौर, वास, खरगोन, शहडोलसह आजुबाजूच्या शहरात भाविकांनी शिव मंदिरात जाऊन नंदीच्या मूर्तीला दूध पाजण्यासाठी एकच गर्दी केल्याचं चित्र दिसून येत आहे.