काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 09:59 IST2025-06-04T09:58:24+5:302025-06-04T09:59:08+5:30

मध्य प्रदेशातील झाबुआ येथील मेघनगर भागात रात्री एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे.

madhya pradesh jhabua road accident truck maruti death injured rajasthan | काळाचा घाला! लग्नावरुन परतणाऱ्या व्हॅनवर सिमेंटने भरलेला ट्रक उलटला, ९ जणांचा मृत्यू

फोटो - आजतक

मध्य प्रदेशातील झाबुआ येथील मेघनगर भागात रात्री एक भीषण अपघात झाला, ज्यामध्ये ९ जणांचा मृत्यू झाला आहे. राजस्थानहून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक मारुती इको व्हॅनवर उलटला. इकोमधील ११ पैकी ९ जणांचा मृत्यू झाला. हा अपघात रात्री ३ ते ४ वाजण्याच्या सुमारास घडला.

मिळालेल्या माहितीनुसार,  मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यात सिमेंटने भरलेला ट्रेलर ट्रक एका व्हॅनवर उलटल्याने नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले. लग्नावरून परतत असताना काळाने घाला घातला. एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू झाला आहे. 

झाबुआचे पोलीस अधीक्षक पद्मविलोचन शुक्ला यांनी दिलेल्या माहितीनुसार, "मेघनगर तहसील क्षेत्रातील संजेली रेल्वे क्रॉसिंगजवळील रस्त्यावरून ट्रक बांधकामाधीन रेल्वे ओव्हर-ब्रिज (आरओबी) ओलांडत असताना नियंत्रण सुटलं आणि तो व्हॅनवर उलटला. या अपघातात नऊ जणांचा मृत्यू झाला आणि दोन जण जखमी झाले."

Web Title: madhya pradesh jhabua road accident truck maruti death injured rajasthan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.