"बायकोपासून वाचवा...!" आई आणि भावासमोर छातीवर बसून महिलेची पतीला बेदम मारहाण; Video Viral
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2025 15:37 IST2025-04-03T15:35:58+5:302025-04-03T15:37:05+5:30
समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तिचा पती लोकेश याला त्याच्या छातीवर बसून बेदम मारहणार करताना दिसत आहे...

"बायकोपासून वाचवा...!" आई आणि भावासमोर छातीवर बसून महिलेची पतीला बेदम मारहाण; Video Viral
गेल्या काही दिवसांपासून महिलांचे असे अनेक व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यांत त्या त्यांच्या पतीला बेदम मारहाण अथवा त्यांचा छळ करताना दिसत आहेत. नुकताच, मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यातून असाच एक प्रकार समोर आला आहे. येथे एका लोको पायलटची पत्नी त्याला रोज मारहाण करत होती. जेव्हा त्यांच्या घरात कॅमेरा बसवला तेव्हा हा संपूर्ण प्रकार समोर आला. आता या प्रकरणाचा आणखी एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
छातीवर बसून मारहाण -
मध्य प्रदेशातून समोर आलेल्या या नव्या व्हिडिओमध्ये संबंधित महिला तिचा पती लोकेश याला त्याच्या छातीवर बसून बेदम मारहणार करताना दिसत आहे. हा संपूर्ण व्हिडिओ कॅमेऱ्यात कैद झाला असून आता पुरावा म्हणून वापरला जात आहे.
व्हिडिओमध्ये दिसत आहे की, लोको पायलटची पत्नी हर्षिता रैकवार त्याला मारहाण करत आहे, तर तिची आई तिच्या शेजारी उभी आहे. महत्वाचे म्हणजे, हर्षिता तिच्या आईच्या सांगण्यावरून तिच्या पतीला बेदम मारहाण करत असल्याचे बोलले जात आहे. हर्षिताचा भाऊही तेथेच उभा असलेला दिसत आहे. त्याच्या जवळ एक बाळही दिसत आहे. महत्वाचे म्हणजे, हा व्हिडिओ २० मार्चचा असल्याचे बोलले जात आहे. तो आता सोशल मीडियावर तुफान शेअर होत आहे.
मध्यप्रदेश: पन्ना निवासी लोको पायलट लोकेश कुमार अपनी पत्नी और सास द्वारा मारने का वीडियो एसपी साईं कृष्णा से शिकायत की है. सीसीटीवी 20 मैच का है,जिसमें पत्नी हर्षिता रैकवार , सास और भाई लोकेश से मारपीट कर रहे हैं। pic.twitter.com/LkdmF70fAE
— Rajendra Raj (@iamrajendraraj) April 2, 2025
'मला माझ्या पत्नीपासून वाचवा...' -
यापूर्वी लोकेशने एक व्हिडिओही जारी केला होता, त्या व्हिडिओमध्ये तो, माझी पत्नी मला मारहाण करते, मला माझ्या पत्नीपासून वाचवा, असे म्हणताना दिसत आहे. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर इतरही व्हिडिओ शेअर करण्यात आले. याशिवाय, माझी पत्नी मला खोट्या केसमध्ये आणि हुंड्याच्या प्रकरणात अडकवण्याची धमकी देते. तसेच तिचे संपूर्ण कुटुंब आपल्याला त्रास देते, असेही लोकेशने म्हटले आहे. या संदर्भात सोशल मीडियावरही अनेक युजर् संताप व्यक्त करत आहेत.