Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 11, 2018 13:19 IST2018-12-11T13:16:52+5:302018-12-11T13:19:34+5:30
230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीत काँग्रेस आणि भाजपामध्ये बरोबरीची टक्कर सुरु आहे.

Madhya Pradesh Assembly Election 2018: जनादेशातून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत - ज्योतिरादित्य शिंदे
भोपाळ - मध्य प्रदेशमध्ये 15 वर्षांपासून सत्तेबाहेर असलेल्या काँग्रेसनेभाजपाला कडवी झुंज दिली आहे. 230 जागा असलेल्या मध्य प्रदेश विधानसभेच्या मतमोजणीतकाँग्रेस आणि भाजपामध्ये बरोबरीची टक्कर सुरु आहे. दरम्यान, मध्य प्रदेशमधील जनादेशामधून परिवर्तनाचे स्पष्ट संकेत मिळत आहेत, असा दावा मध्य प्रदेशमधील काँग्रेसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे यांनी म्हटले आहे.
मध्य प्रदेशमधील मतमोजणीचे कल हाती येऊ लागल्यानंतर ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, "मध्य प्रदेशमधील मतमोजणी'च्या कलांमधून परिवर्तनाचे संकेत मिळत आहेत. आता काँग्रेसचे सर्व नेते जनतेने दाखवलेला विश्वास सार्थ ठरवतील, अशी अपेक्षा करतो."
जनादेश बदलाव का स्पष्ट संकेत दे रहा है।
— Jyotiraditya Scindia (@JM_Scindia) December 11, 2018
कांग्रेस के सभी जाँबाज़ साथियों से उम्मीद करता हूँ कि पूरी जिम्मेदारी से जनता की आशाओं पर खरे उतरेंगे।#MadhyaPradeshElections2018pic.twitter.com/zVgQT8Xvr1
भाजपाचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या मध्य प्रदेशमधील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने जोरदार मुसंडी मारली आहे. दरम्यान, सध्याच्या कलांनुसार काँग्रेस 110 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजपा 110 जागांवर आघाडीवर आहे. तसेच बसपा व इतर पक्ष मिळून 12 जागांवर आघाडीवर आहेत. त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये भाजपाला जबरदस्त धक्का बसण्याची शक्यता आहे.