शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुमची मुलं रात्री कुठं जातात, काय करतात?"; पुणे अपघातानंतर बिल्डरांना अजितदादा काय म्हणाले?
2
पुणे अपघात प्रकरणी गृहमंत्र्यांनी त्यांची जबाबदारी पाळली, त्यामुळे...; शरद पवारांचं विधान
3
PAK vs ENG 2nd T20 : इंग्लंडच्या धरतीवर यजमानच 'बॉस', पाकिस्तानचं रडगाणं सुरूच
4
"वायफळ बडबड करू नका..."; राऊतांचा दावा काँग्रेसनेच खोडला, ठाकरे गटालाही फटकारलं
5
“२०१९ला संजय राऊतांनी CM होण्यासाठी प्रयत्न केले होते, हिंमत असेल तर...”: चंद्रशेखर बावनकुळे
6
डिजिटल इंडियाचा जगभरात डंका; मॉरिशस आणि UAE नंतर आता 'या' देशातही चालणार रुपे कार्ड!
7
संजय राऊतांचा खळबळजनक दावा; नितीन गडकरींच्या पराभवासाठी मोदी-शाहांचा प्रयत्न
8
PHOTOS : ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडिया रवाना; पहिल्या बॅचमध्ये हार्दिक पांड्या दिसला नाही
9
“जीवापेक्षा मोठे काही नाही, शेतकऱ्यांनी टोकाचे पाऊल उचलू नये, सरकारने...”: मनोज जरांगे पाटील
10
शरद पवारांना दुहेरी धक्का; २ अत्यंत विश्वासू शिलेदार पक्षाची साथ सोडणार?
11
"कुणाच्या तरी चुकीमुळे कोणीतरी जीव गमावतं...", अपघाताबाबत अभिजीत खांडकेकर स्पष्टच बोलला
12
“सहाव्या टप्प्यात इंडिया आघाडीने २७२ जागांचा आकडा गाठला, भाजपाचा पराभव निश्चित”: काँग्रेस
13
१ जूनपासून गॅस सिलेंडर ते बँकिंगचे नियम बदलणार; थेट तुमच्या खिशावर परिणाम होणार
14
Cyclone Remal: 'रेमल' चक्रीवादळ आज बंगालमध्ये धडकणार, एनडीआरएफचे पथक सतर्क; महाराष्ट्रावर परिणाम होणार?
15
“पंतप्रधान मोदींची भाषा अन् भाजपाच्या जागा दोन्ही सातत्याने घसरत चालल्या आहेत”: राहुल गांधी
16
“PM मोदींची १०० वेळा जगभ्रमंती, उद्धव ठाकरे परदेशात गेले तर पोटात का दुखते”; राऊतांची टीका
17
दिल्लीतही मोठी आग, बेबी केअर सेंटरमध्ये ७ नवजात बालकांचा मृत्यू, ५ गंभीर जखमी
18
आजचे राशीभविष्य: उत्पन्नात वाढ, विदेश व्यापारात लाभ; नशिबाची साथ, येणी वसूल होतील
19
"नशिबाने माझ्या नावाचा कोणी सुलतान नव्हता, नाहीतर...", नावावरून ट्रोल करणाऱ्यांना आस्ताद काळेने सुनावलं
20
येत्या ४ जूनला मनेरचा लाडू तयार ठेवा, या लाडूत मोठे सामर्थ्य- पंतप्रधान मोदी

मध्य प्रदेशमध्ये प्रचार करायला आलेल्या भाजपा आमदाराला तरुणाकडून मारहाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:35 PM

मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे.

ठळक मुद्दे मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहेराज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनाही काही ठिकाणी तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहेभाजपाच्या मंदसौर विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही प्रचारादरम्यान स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला

भोपाळ - मध्य प्रदेश विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची तारीख जससशी जवळ येऊ लागली आहे, तसतसे राज्यातील राजकीय वातावरण चांगलेच तापत चालले आहे. राज्यात 15 वर्षांपासून सत्तेवर असलेल्या भाजपाच्या लोकप्रतिनिधींनाही काही ठिकाणी तीव्र विरोधाचा सामना करावा लागत आहे. भाजपाच्या मंदसौर विधानसभा मतदारसंघातील आमदारांनाही प्रचारादरम्यान स्थानिकांच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला. तसेच वादावादीदरम्यान एका तरुणाने या आमदारांच्या श्रीमुखात भडकवल्याचा धक्कादायक प्रकार घडला. मंदसौर मतदारसंघातून दोन वेळा निवडून आलेल्या यशपाल सिंह सिसोदिया यांना भाजपाने येथून पुन्हा एकदा तिकीट दिले आहे. येथे त्यांच्यासमोर काँग्रेस उमेदवरा नरेंद्र नाहटा यांचे आव्हान आहे.  सिसोदिया हे सध्या आपल्या मतदारसंघात प्रचार करत असून, प्रचार दौऱ्यादरम्यान काही ठिकाणी त्यांना लोकांच्या विरोधाचाही सामना करावा लागत आहे. दरम्यान, मंदसौरमधील अलावदाखेडी गावात प्रचार करत असताना एका युवकाने सिसेदिया यांच्या श्रीमुखात भडकवली.  ऐन प्रचार अभियानादरम्यान घडलेल्या या प्रकारामुळे खळबळ उडाली. दरम्यान, यशपाल सिंह सिसोदिया यांना मारहाण करणाऱ्या तरुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत, अशी माहिती सदर तरुणाच्या वडिलांनी दिली आहे. तरुणाचे मानसिक संतुलन बिघडलेले असल्याने त्याच्यावर अद्याप कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. तसेच संबंधित आमदारांनीही या प्रकरणी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. या निवडणुकीत प्रचारादरम्यान, भाजपाच्या नेत्यांना मतदारांच्या नाराजीचा सामना करावा लागत आहे. याआधी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांची पत्नी साधना सिंह आणि मंत्री दीपक जोशी यांनाही विरोधाचा सामना करावा लागला होता. 

टॅग्स :Madhya Pradesh Assembly Election 2018मध्य प्रदेश विधानसभा निवडणूक 2018Madhya Pradeshमध्य प्रदेशPoliticsराजकारणBJPभाजपा