धक्कादायक! सिमकार्ड दिलं नाही म्हणून 12 वर्षीय मुलाची आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2018 15:22 IST2018-11-15T15:20:14+5:302018-11-15T15:22:55+5:30
पंजाबच्या लुधियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी सिमकार्ड दिलं नाही म्हणून एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

धक्कादायक! सिमकार्ड दिलं नाही म्हणून 12 वर्षीय मुलाची आत्महत्या
लुधियाणा - पंजाबच्या लुधियाणामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पालकांनी सिमकार्ड दिलं नाही म्हणून एका 12 वर्षीय मुलाने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लुधियाणातील भगवान दास कॉलनीत ही घटना घडली. शाळेतून घरी आल्यावर मुलाने त्याच्या आईवडिलांकडे मोबाईलसाठी नव्या सिमकार्डची मागणी केली. मात्र त्याच्या घरच्या मंडळींनी त्याला नवीन सिमकार्ड घेऊन देण्यास नकार दिला.
मुलाने सिमकार्डसाठी खूप हट्ट केला. मात्र तरीही पालकांनी सिमकार्ड घेऊन दिले नाही. त्यामुळे नाराज झालेल्या मुलाने स्वत: खोलीत बंदिस्त केले आणि आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला. खूप वेळ मुलगा खोलीबाहेर आला नाही म्हणून आईवडिलांनी पाहिलं असता तो गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. उपचारासाठी त्याला तातडीने जवळच्या रूग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी मुलाला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.