इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी (LPG) तुटवडा निर्माण झाल्याच्या आणि बुकिंगचे नियम बदलल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर आता अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, सोशल मीडियावर व्हायरल होणारे दावे फेटाळून लावले आहेत.
मंगळवारी रात्रीपासून सोशल मीडियावर एक खळबळजनक माहिती व्हायरल होत होती. यामध्ये दावा केला होता की, पेट्रोलियम कंपन्यांवरील दबावामुळे उज्ज्वला योजना आणि सामान्य ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. या अफवांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यावर आता पीआयबीने (PIB) सत्य समोर आणले आहे.
इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला
नियम बदललेला नाही
सरकारने स्पष्ट केले आहे की, एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या मूळ नियमांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही.
शहरी भागासाठी नियम
शहरांमध्ये सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांचा नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहील.
ग्रामीण भागासाठी नियम
गावांमध्ये कनेक्शनचा प्रकार कोणताही असला, तरी तिथे ४५ दिवसांचे अंतर राखले जाईल.
पुरेसा साठा उपलब्ध
देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
उज्ज्वला योजनेबाबत स्पष्टता
उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी वेगळा नियम असल्याची चर्चा चुकीची असून, भौगोलिक क्षेत्रानुसार (शहरी/ग्रामीण) जे नियम आहेत तेच लागू राहतील.
सरकारने स्पष्टीकरण दिले असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची स्थिती पाहता गॅस पुरवठ्यावर भविष्यात काही परिणाम होतो का, याकडे पेट्रोलियम कंपन्यांचे लक्ष आहे. मात्र, सध्या तरी ग्राहकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे.
Web Summary : The government refuted rumors of LPG shortages and booking rule changes due to the Iran conflict. Existing rules remain: 25 days for urban, 45 for rural areas. Ample stock is available, no need to panic, clarified officials.
Web Summary : सरकार ने ईरान संघर्ष के कारण एलपीजी की कमी और बुकिंग नियमों में बदलाव की अफवाहों का खंडन किया। मौजूदा नियम बरकरार: शहरी क्षेत्रों के लिए 25 दिन, ग्रामीण क्षेत्रों के लिए 45 दिन। पर्याप्त स्टॉक उपलब्ध है, घबराने की जरूरत नहीं, अधिकारियों ने स्पष्ट किया।