LPG Gas Booking Rules: गॅस बुकिंगचे नियम बदलले? इराण युद्ध आणि सोशल मीडियावरील अफवांवर सरकारचे मोठे स्पष्टीकरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 13:19 IST2026-03-25T13:14:13+5:302026-03-25T13:19:17+5:30
नियमांमध्ये कोणताही बदल करण्यात आलेला नाही. शहरी भागांमध्ये सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांचा नियम लागू राहील, तर ग्रामीण भागांमध्ये ४५ दिवसांचे अंतर कायम राहणार आहे.

LPG Gas Booking Rules: गॅस बुकिंगचे नियम बदलले? इराण युद्ध आणि सोशल मीडियावरील अफवांवर सरकारचे मोठे स्पष्टीकरण
इराणमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे देशात एलपीजी (LPG) तुटवडा निर्माण झाल्याच्या आणि बुकिंगचे नियम बदलल्याच्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र, केंद्र सरकारने यावर आता अधिकृत स्पष्टीकरण दिले असून, सोशल मीडियावर व्हायरल होणारे दावे फेटाळून लावले आहेत.
मंगळवारी रात्रीपासून सोशल मीडियावर एक खळबळजनक माहिती व्हायरल होत होती. यामध्ये दावा केला होता की, पेट्रोलियम कंपन्यांवरील दबावामुळे उज्ज्वला योजना आणि सामान्य ग्राहकांसाठी सिलेंडर बुकिंगची कालमर्यादा वाढवण्यात आली आहे. या अफवांमुळे सर्वसामान्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले होते, ज्यावर आता पीआयबीने (PIB) सत्य समोर आणले आहे.
इराण-अमेरिका युद्ध थांबवण्यासाठी पाकिस्तानची मध्यस्थी; १५ कलमी तडजोड कराराचा प्रस्ताव पाठवला
नियम बदललेला नाही
सरकारने स्पष्ट केले आहे की, एलपीजी सिलेंडर बुकिंगच्या मूळ नियमांमध्ये कोणताही नवीन बदल करण्यात आलेला नाही.
शहरी भागासाठी नियम
शहरांमध्ये सिलेंडर बुकिंगसाठी २५ दिवसांचा नियम पूर्वीप्रमाणेच लागू राहील.
ग्रामीण भागासाठी नियम
गावांमध्ये कनेक्शनचा प्रकार कोणताही असला, तरी तिथे ४५ दिवसांचे अंतर राखले जाईल.
Reports claiming changes in LPG refill booking timelines are incorrect. There is no change in the existing timelines (25 days in urban areas / 45 days in rural areas), and LPG supplies remain adequate across the country. Please rely only on official sources and avoid panic…
— Indian Oil Corp Ltd (@IndianOilcl) March 25, 2026
पुरेसा साठा उपलब्ध
देशात पेट्रोल, डिझेल आणि एलपीजीचा पुरेसा साठा आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही.
उज्ज्वला योजनेबाबत स्पष्टता
उज्ज्वला लाभार्थ्यांसाठी वेगळा नियम असल्याची चर्चा चुकीची असून, भौगोलिक क्षेत्रानुसार (शहरी/ग्रामीण) जे नियम आहेत तेच लागू राहतील.
सरकारने स्पष्टीकरण दिले असले तरी, आंतरराष्ट्रीय स्तरावर युद्धाची स्थिती पाहता गॅस पुरवठ्यावर भविष्यात काही परिणाम होतो का, याकडे पेट्रोलियम कंपन्यांचे लक्ष आहे. मात्र, सध्या तरी ग्राहकांनी अफवांकडे दुर्लक्ष करावे.
🚫 दावा:
— PIB Fact Check (@PIBFactCheck) March 25, 2026
न्यूज़ चैनल @News18Bihar के क्लिप में दावा किया जा रहा है कि LPG गैस बुकिंग के नियम बदल दिए गए हैं और अब 25 दिन की जगह 35 दिन बाद ही बुकिंग कराई जा सकेगी।
❌ यह दावा फर्जी है।
✅ सरकार द्वारा LPG रिफिल बुकिंग के नियमों में कोई बदलाव नहीं किया गया है, समय-सीमा पहले की… pic.twitter.com/3GLZniX231