शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
2
Latest Marathi News LIVE Updates: "मोदी तृणमूल काँग्रेसला मत द्या म्हणाले, तरी ममता बॅनर्जी विरोध करतील", अमित शाहांचा निशाणा
3
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
4
'विशेष प्रकरण' म्हणून याचा सहानुभूतीपूर्वक विचार करा!; आदित्य ठाकरेंचे CM फडणवीस यांना पत्र
5
अमेरिका ‘आर या पार’ करायच्या तयारीत; इराणची कोंडी करणार, होर्मुझबाबत २४ तासांत ४ मोठे निर्णय!
6
४ दिवसांमध्ये ₹९६०० नं स्वस्त झाली चांदी; सोन्याचे दर १७०० रुपयांनी घसरले; पटापट चेक करा आजचे दर
7
‘या’ क्रिकेटपटूविना निम्म्याने घटली मुंबई इंडियन्सची ताकद, फलंदाजांचं पितळ पडलं उघडं 
8
इस्रायली हवाई हल्ल्यात लेबनॉनची पत्रकार ठार; युद्धकाळात ९ पत्रकारांची हत्या!
9
"वडिलांनी माझ्या मृतदेहाला हात लावू नये"; वकिलाने उचललं टोकाचं पाऊल, उडी मारली अन्...
10
इराणकडे जाणारे जहाज रोखले, हिंदी महासागरात अमेरिकेच्या सैन्याची कारवाई
11
इराण युद्ध थांबवायचे की सुरु करायचे...! ट्रम्प यांच्याकडे फक्त ७ दिवस! '१ मे' पूर्वी मोठा निर्णय घेण्याची शक्यता
12
घटस्फोटाआधी दुसरा विवाह मोठा गुन्हा नाही; आरपीएफ कर्मचाऱ्याला हायकोर्टाचा दिलासा
13
देशातील बँकिंग सेक्टरवर 'Mythos' चे सावट; नेमका काय धोका? अर्थमंत्र्यांनी दिला इशारा...
14
E-Bike: ई-बाईक आहे? ऑफिसला जातानाही व्हा मालामाल... 
15
Gautam Adani News: गौतम अदानी १०० अब्ज डॉलरच्या क्लबमध्ये सामील; मुकेश अंबानींना टाकलं मागे
16
Mumbai University: प्रश्नपत्रिका फूटप्रकरणी शिपायावर गुन्हा दाखल, तीन कर्मचाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस; एक बडतर्फ 
17
बंगालमध्ये पहिल्या टप्प्यातील १५२ पैकी भाजपा किती जागा जिंकणार? अमित शाहांनी थेट आकडाच सांगितला
18
आता फक्त ५ मिनिटांत होणार ब्रेस्ट कॅन्सरचे निदान; 'केईएम'मध्ये अत्याधुनिक मशिन दाखल!
19
तुमच्या घरात तुळशीच्या बाजूला ‘या’ गोष्टी ठेवल्या नाही ना? लक्ष्मी नाराज होईल, निघून जाईल!
20
मुंबई, महाराष्ट्राचा Video शेअर करत इराणने अमेरिकेला फटकारले; ट्रम्प यांना दिला मोठा सल्ला!
Daily Top 2Weekly Top 5

कंधारात अल्प पावसाचा पेरणीचा डाव

By admin | Updated: June 15, 2015 21:29 IST

शेतकर्‍यांची साहित्य बी-बियाणे खरेदीसाठी लगबग

शेतकर्‍यांची साहित्य बी-बियाणे खरेदीसाठी लगबग
कंधार : निसर्ग संकटाने कंटाळलेल्या शेतकर्‍यांनी मोठ्या धाडसाने अल्प पावसावर पेरणीचा डाव सुरू केला आहे़ रविवारी पेरणीचा मुहूर्त साधला असून अमावस्यानंतर जोमाने पेरणी करण्यासाठी बी-बियाणे, खते, साहित्य खरेदीसाठी शेतकर्‍यांनी गर्दी केल्याचे चित्र आहे़
निसर्ग आपत्तीला शेतकरी पुरता वैतागून गेला आहे़ तरीही शेतीशिवाय अन्य पर्याय नसल्याने शेतीवर जीव लावणे क्रमप्राप्त आहे़ मागील वर्षापासून निसर्ग संकटाचा ससेमिरा लागल्याने शेतकर्‍यांची आर्थिक कोंडी झाली आहे़ परंतु सरासरी पावसाचे प्रमाण चांगले राहील़ या भाकिताने आता आनंद द्विगुणित झाला आहे़ मागील वर्षीचे दुष्काळ, गारपीट आदीला पाठीमागे टाकत नव्या जोमाने शेतीत रमण्याचा संकल्प दिसून येत आहे़ कारणही तसेच घडत असून तूरळक, हलका, मध्यम पावसाने हुरूप आला आहे़
तालुक्यात कंधार, बारूळ, फूलवळ, पेठवडज, कुरुळा, उस्माननगर या ठिकाणच्या पर्जन्यमापक कंेद्रावर पावसाची नोंद केली गेली़ त्यानुसर निसर्ग पाऊस पेरणीसाठी अनुकूल राहणाऱ असेच वाटत असल्याने दमदारपणे पेरणीचा मुहूर्त साधण्यात अनेक शेतकर्‍यांनी कसर सोडली नाही़ २ जून रोजी सरासरी २ मि़मी़ पाऊस झाला़ ७ जूनला सुमारे ४ मि़मी़, ८ जूनला ११ मि़मी, १० जूनला २ मि़मी़, १२ जूनला १७ मि़मी़, १३ जूनला ३० मि़मी़ आणि १४ जूनला ५ मि़मी़ असा २ ते १४ जून या कालावधीत ७३़७३ मि़मी़ सरासरी पाऊस झाला़
शाळेचे सत्र सुरू होण्यास व पेरणीचा हंगाम एकाचवेळी आला आहे़ त्यामुळे शेतकर्‍यांची भलतीच धांदल होत आहे़ परंतु ढगाळ वातावरण आणि दररोज पावसाची हजेरी होत असल्याने शेतकर्‍यांच्या आशा पल्लवीत झाल्याने पेरणीला सुरुवात झाली आहे़ त्यात कापूस लागवड अधिक आहे़