Video: हरियाणाच्या शाळेत प्रभू श्रीरामांची थट्टा; ऑलिम्पिक मेडलिस्टनं केली मान्यता रद्द करण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 7, 2021 03:57 PM2021-11-07T15:57:39+5:302021-11-07T15:58:05+5:30

योगेश्वर दत्तच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे समर्थन करत शाळेवर संताप व्यक्त केला आहे.

lord ram insulted in haryana tohana saint mary dav school london olympic medalist yogeshwar dutt demanded for strict action against school | Video: हरियाणाच्या शाळेत प्रभू श्रीरामांची थट्टा; ऑलिम्पिक मेडलिस्टनं केली मान्यता रद्द करण्याची मागणी

Video: हरियाणाच्या शाळेत प्रभू श्रीरामांची थट्टा; ऑलिम्पिक मेडलिस्टनं केली मान्यता रद्द करण्याची मागणी

googlenewsNext

हरियाणातील टोहाना येथील सेंट मेरी स्कूलमध्ये मुलांच्या कार्यक्रमादरम्यान भगवान श्रीराम यांची थट्टा करण्यात आली आहे. यावर २०१२ लंडन ऑलिम्पिकमधील कांस्यपदक विजेत्या योगेश्वर दत्तने (Yogeshwar Dutt) तीव्र शब्दात प्रतिक्रिया दिली आहे. या कार्यक्रमाचा व्हिडिओ पोस्ट करत, संबंधित शाळेची मान्यता तात्काळ रद्द करण्यात यावी अशी मागणी योगेश्वरने केली आहे.

योगेश्वर दत्तने या व्हिडिओवर राग व्यक्त करत ट्विट केले आहे, की, ’श्रीरामांचे चरित्र हे मर्यादेचे समानार्थी आहे, मात्र, ST. Mary’s School, टोहाना येथे मुलांसमोर #श्रीरामांच्या चरित्रासोबत अशा प्रकारची थट्टा करणे आणि ते चुकीच्या पद्धतीने दाखवणे, हा एक विकृत विचार आणि मानसिकता आहे. अशा प्रकारच्या शाळांची मान्यता तत्काळ रद्द करायला हवी.’

योगेश्वर दत्तच्या या पोस्टवर अनेकांनी त्यांचे समर्थन करत शाळेवर संताप व्यक्त केला आहे. तसेच कमल सिंगला नावाच्या एका युझरने या पोस्टवर कमेंट करत एक पत्र टाकले आणि शाळेविरोधात एफआयआर नोंदवण्यात आली असल्याचे म्हटले आहे. मात्र, यासंदर्भात अद्याप कुठल्याही प्रकारची अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही.

या पत्रात बजरंग दलाच्या वतीने शाळेवर कारवाईची मागणी  करण्यात आली आहे. यात म्हणण्यात आले आहे की, जुनी सब्जी मंडी, टोहाना आणि डीएव्ही पब्लिक स्कूल, डांगरा रोड येथील सेंट मेरी स्कूलमध्ये रामलीला खेळताना भगवान श्रीरामाची थट्टा करण्यात आली.

हे पत्र बजरंग दल टोहानाचे सदस्य दीपक सैनी आणि राकेश गोयल यांच्या नावाने एसएचओ टोहाणा यांना पाठवण्यात आले आहे. यात या शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक आणि नाटकाची पटकथा लिहिणाऱ्यांवर गुन्हा दाखल करून दोन्ही शाळांवर कडक कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

बजरंग दलाचे पदाधिकारी दीपक सैनी यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, हिंदूंच्या भावनांचा अपमान करणे ही या शाळांची सवय झाली आहे. या प्रकरणात आमच्यावर तडजोड करण्यासाठी दबाव टाकला जात आहे. पोलिसांच्या कार्यशैलीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यांच्या म्हणण्यानुसार, तक्रार देऊनही पोलिसांनी अद्याप याप्रकरणी कोणतीही ठोस कारवाई केलेली नाही.

दीपक सैनी यांनी सांगितले की, बजरंग दलानेही पोलिसांच्या शिथिलतेविरोधात निदर्शने केली होती. या निदर्शनात सेंट मेरीज आणि डीएव्ही शाळेच्या बहिष्काराचीही घोषणाबाजी करण्यात आली.

Web Title: lord ram insulted in haryana tohana saint mary dav school london olympic medalist yogeshwar dutt demanded for strict action against school

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.