शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

बघाव तेव्हा बायको मोबाइलवर, नवऱ्याने उचलला चाकू अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 06:46 IST

रिल्स बनवून समाजमाध्यमांवर टाकण्याचे वेड अनेकांना लागले आहे. मात्र अशा वेडापायी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. कोलकात्याच्या हरिनारायणपूरमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत रिल्स बनवते, ‘मेटा’वर अनोळखी मित्रांशी बोलते म्हणून तिचा गळा चिरून खून केला. 

रिल्स बनवून समाजमाध्यमांवर टाकण्याचे वेड अनेकांना लागले आहे. मात्र अशा वेडापायी एका महिलेला आपला जीव गमवावा लागला. कोलकात्याच्या हरिनारायणपूरमध्ये एका ३८ वर्षीय व्यक्तीने पत्नी सतत रिल्स बनवते, ‘मेटा’वर अनोळखी मित्रांशी बोलते म्हणून तिचा गळा चिरून खून केला. 

आरोपीला दोन मुले आहेत. घटनेच्या दिवशी मुले घरी नव्हती. सातवीत शिकणारा मुलगा परत आला तेव्हा त्याला आईचा मृतदेह रक्ताने माखलेला दिसला. परिमल वैद्य असे आरोपीचे नाव आहे. त्याचा विवाह अपर्णा नावाच्या महिलेशी झाला होता. महिला सतत रिल्स बनवत असे, अनोळखी व्यक्तींसोबत ‘मेटा’वर बोलत असे. पतीने याला अनेकदा विरोध केला होता.

घटनेच्या दिवशीही त्याचा पत्नीशी वाद झाला होता. भांडण इतके वाढले की, त्याने जवळच ठेवलेल्या भाजी कापण्याच्या चाकूने पत्नीच्या मानेवर वार केले. हल्ला केल्यानंतर परिमल घरातून पळून गेला. जास्त रक्तस्त्राव झाल्याने महिलेचा जागीच मृत्यू झाला.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीrelationshipरिलेशनशिपwest bengalपश्चिम बंगाल