VIDEO : मायावती रोज करतात फेशियल; भाजपा आमदाराची घसरली जीभ

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 16:07 IST2019-03-19T16:05:45+5:302019-03-19T16:07:07+5:30

भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे.  बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना सुरेंद्र सिंह यांची जीभ घसरली.

loksabha elections 2019 : bjp mla surendra singh controversial statement on bsp supremo mayawati | VIDEO : मायावती रोज करतात फेशियल; भाजपा आमदाराची घसरली जीभ

VIDEO : मायावती रोज करतात फेशियल; भाजपा आमदाराची घसरली जीभ

नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे. लोकसभा निवडणुकीसाठी तारखांची घोषणा झाल्यापासून सर्वच पक्षांनी जोरदार तयारी सुरु केली आहे. अनेक पक्षांकडून आपल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात येत आहे. तसेच, सत्ताधारी आणि विरोधकांकडून आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. यातच, भाजपाचे आमदार सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधान केले आहे.  बहुजन समाजवादी पार्टीच्या प्रमुख मायावती यांच्यावर टीका करताना सुरेंद्र सिंह यांची जीभ घसरली.

मायावती यांच्यावर निशाना साधताना सुरेंद्र सिंह म्हणाले, 'मायावती स्वत: रोज फेशियल करतात. त्या आपल्या नेत्याला शौकीन कसे काय म्हणू शकतात. त्यांचे केस पांढरे झाले आहेत. पण, ते रंगवून स्वत:ला जवान समजतात. त्यांनी वयाची साठी पार केली आहे. मात्र, त्यांचे केस काळे आहेत. आमचे पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ कपडे परिधान करतात. यामध्ये शौकीन, असे काय आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सुरुवातीपासूनच स्वच्छ कपडे परिधान करण्याची सवय आहे.' 


मायावती यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राहणीमानावर टीका केली होती. यावरुन पलटवार करताना सुरेंद्र सिंह यांनी मायावती यांच्याबद्दल वादग्रस्त विधान केले.  दरम्यान, या आधीही सुरेंद्र सिंह यांनी वादग्रस्त विधाने केली आहेत. 

Web Title: loksabha elections 2019 : bjp mla surendra singh controversial statement on bsp supremo mayawati