शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

राम मंदिर, सनातन, ईडी-सीबीआय ते इलेक्टोरल बाँड्स... PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 15, 2024 15:58 IST

पीएम मोदींनी राम मंदिर, सनातन, केंद्रीय तपास यंत्रणाांसह इतर मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले.

LokSabha Election: लोकसभा निवडणूक काही दिवसांवर येऊन ठेपली आहे, त्यामुळे निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदीही मॅरेथॉन रॅली आणि जाहीर सभा घेत आहेत. अशातच आज संध्याकाळी 5:30 वाजता पंतप्रधान मोदीनी ANI वृत्तसंस्थेला दिलेली एक प्रदीर्घ मुलाखत समोर येणार आहे, ज्यात त्यांनी देशाशी संबंधित सर्व महत्त्वाच्या प्रश्नांची तपशीलवार उत्तरे दिली आहेत. 

या मुलाखतीत पीएम मोदींनी राम मंदिरापासून ते सनातन, केंद्रीय तपास यंत्रणा आणि इतर मुद्द्यांवरुन विरोधी पक्षांना चांगलेच धारेवर धरले आहे. तामिळनाडूतील द्रमुक नेत्यांनी सनातनवर अनेक विधाने केली, यावर पीएम मोदी म्हणाले की, द्रमुकचा जन्म केवळ द्वेषपूर्ण विधाने करण्यासाठी झाला आहे. द्रमुकविरोधात लोकांमध्ये प्रचंड रोष आहे. त्यामुळे मतदार आता भाजपकडे वळत आहेत. काँग्रेसने द्रमुकला विचारले पाहिजे की, त्यांची एवढी कोणती मजबुरी आहे, ज्यामुळे ते सातत्याने सनातन धर्माचा अपमान करत आहेत. 

राम मंदिर विरोधकांचे राजकीय हत्यार त्याचवेळी पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारला की, राम मंदिर प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे राजकारण व्हायला नको होते, पण ते झाले. यावर मोदी म्हणाले की, रा मंदिर त्यांच्यासाठी (काँग्रेस) राजकीय शस्त्र आहे. रशिया-युक्रेन युद्ध थांबवण्याच्या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदींना प्रश्न विचारण्यात आला. या प्रश्नाला उत्तर देताना पीएम मोदी म्हणाले की, दोन्ही राष्ट्रपतींसोबत माझे अतिशय मैत्रीपूर्ण संबंध आहेत. तिथे अडकलेल्या भारतीयांना बाहेर काढण्यासाठी मी त्यांची मदत मागितली. 

निवडणूक रोखे रद्द करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर बोलताना मोदी म्हणाले की, इलेक्टोरल बाँड्समुळेच तुम्हाला पैसे कुठून आले, कोणत्या कंपनीने दिली? त्यांनी ते कसे दिले? त्यांनी ते कुठे दिले? या सर्वांची माहिती मिळत आहे. म्हणूनच मी म्हणतो की, विरोधकांनी प्रामाणिकपणे विचार केल्यावर त्यांना सर्वाधिक पश्चाताप होईल.

दरम्यान, पंतप्रधानांनी यावेळी इलेक्टोरल बाँड्स, ईडी-सीबीआय-आयटी, या सर्व एजन्सींवर भाजपचे वर्चस्व असल्याची विरोधकांची टीका. यासह इतर अनेक प्रश्नांची पीएम मोदींनी चोख उत्तर दिली आहेत. पीएम मोदींची संपूर्ण मुलाखत संध्याकाळी 5.30 वाजता प्रसारित होणार आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीBJPभाजपाcongressकाँग्रेसlok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४