शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

भाजपाला हवी ५ ते १०% मतदान वाढ; नवी रणनीती, आता स्थानिक मुद्दे प्रचारात

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 07:29 IST

दुसऱ्या टप्प्यात मतदान वाढविण्यासाठी भाजप नेत्यांवर सोपविली जबाबदारी

संजय शर्मानवी दिल्ली : पहिल्या टप्प्यात झालेल्या कमी मतदानाची दखल घेत भाजपने प्रचाराच्या रणनीतीत बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रीय मुद्द्यांबरोबरच स्थानिक मुद्द्यांवर भर देत प्रचार अधिक धारदार व प्रभावी करण्यात येणार आहे. प्रत्येक लोकसभा मतदारसंघात ५ ते १०% मतदान वाढवण्यासाठी  कामाला लागण्याचे आदेश दिले आहेत. 

पहिल्या टप्प्यात  ६३ टक्क्यांहून कमी मतदान झाल्याने गृहमंत्री अमित शाह,  राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी सर्व वरिष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांची बैठक बोलावली होती. यावेळी सर्व राज्यांतील परिस्थितींचा आढावा घेण्यात आला. 

सत्तेत येण्यासाठी हवे ६६ टक्के मतदान २०१४ मध्ये भाजप सत्तेवर आला तेव्हा ६६ टक्के मतदान झाले होते आणि भाजपने २८४ जागा जिंकल्या होत्या. २०१९ मध्ये भाजप दुसऱ्यांदा सत्तेत परतला तेव्हा ६७.४० टक्के मतदान झाले आणि भाजपने ३०३ जागा जिंकल्या. म्हणजे किमान ६६ टक्के मतदान झाल्यास, भाजपचे सरकार स्थापन होते. 

पहिल्या फेरीत केवळ ६३ टक्के मतदान झाल्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदीही चिंतेत आहेत. त्यामुळे पंतप्रधान मोदी यांनी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना कामाला लागण्याचे निर्देश देण्याचे भाजप नेत्यांना सांगितले आहे. तसेच लोकांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यास कार्यकर्त्यांनी पुढाकार घेण्याचे आदेश दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

बूथस्तरावर मतदान वाढवा

भाजप नेत्यांच्या बैठकीत अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांनी सर्व नेत्यांना कठोर शब्दांत इशारा दिला की, बूथ स्तरावर कार्यकर्त्यांना सक्रिय करा. त्यासाठी प्रत्येक बूथवर पाच ते दहा टक्के मतदान वाढवण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. पुढील सव्वा महिना सर्वांनाच युद्धस्तरावर काम करावे लागेल. भाजपचे सर्व नेते, राष्ट्रीय सरचिटणीस, ज्येष्ठ नेते आणि निवडणूक प्रभारी यांच्यावर मतदानाची टक्केवारी वाढवण्याची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. 

जिल्हास्तरावर वॉररूम भाजप नेत्यांच्या बैठकीत निवडणूक प्रचाराचाही आढावा घेण्यात आला. निवडणुकीत राष्ट्रीय मुद्द्यांचा फारसा परिणाम होत नाही, त्यामुळे आता भाजप स्थानिक प्रश्नही निवडणुकीत मांडणार असल्याचे बैठकीत ठरविण्यात आले. मुद्दे निश्चित करणे आणि विरोधकांच्या हल्ल्याला प्रत्युत्तर देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात वॉर रूम सुरू करण्यात येणार आहे.

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४BJPभाजपाVotingमतदानbig Battles 2024लोकसभा निवडणुक रणांगण २०२४