शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs ENG : टीम इंडियाने 'बॅझबॉल'वाल्यांची जिरवली.. संयम अन् धैर्याची लढाई जिंकली; सामना अनिर्णित
2
अहिल्यानगरमध्ये संविधान भवन उभारले जाणार, उपमुख्यमंत्री अजित पवार यांची घोषणा!
3
रेल्वे रुळ ओलांडताना एक्स्प्रेसनं उडवलं, तिघांचा मृत्यू, माढा येथील घटना!
4
IND vs ENG : स्टोक्स हात मिळवायला आला; पण जड्डू-वॉशिंग्टन दोघांनी आम्ही नाही जा.. म्हणत ठोकली सेंच्युरी
5
Pune Rave Party: 'त्या' दोन रुममध्ये तीन दिवसांपासून रेव्ह पार्टी? कधीपासून बुक होत्या रुम, बिल बघितलं का?
6
मुंबई: बँकेकडून आलेल्या महिलेला मागून धरलं, मानेवर चुंबन घेतलं अन् 'नको तिथे' हात...
7
पाकिस्तानमध्ये बस दरीत कोसळून नऊ जण ठार, दोन लहान बाळांचाही समावेश, ३०हून अधिक जखमी
8
Thane Crime: पालन पोषणाचा खर्च परवडेना, पोटच्या तिन्ही मुलींना पाजलं विष, आईला अटक!
9
VIDEO : स्टोक्सनं दुखावलेल्या खांद्यासह गिलला मारला हाताला झिणझिण्या आणणारा बाउन्सर; मग...
10
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
11
IND vs ENG : वॉशिंग्टनसह जड्डूची फिफ्टी; टीम इंडियावरील मोठ संकट टळलं, पण...
12
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
13
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
14
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
15
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
16
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
17
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
18
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
19
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
20
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?

Lokmat National Conclave : भारत हिंदू राष्ट्र का होऊ शकत नाही? नेपाळ, पाकिस्तानचं उदाहरण देत दिग्विजय सिंह यांचं स्पष्टीकरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2023 12:27 IST

Lokmat National Conclave : नेपाळ आणि पाकिस्तानचं उदाहरण देत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी स्पष्टीकरण दिलं.

संविधानात हिंदू राष्ट्र आहे का? नेपाळमध्ये ९५ टक्के हिंदू आहेत. त्यांच्या संसदेनं आपल्याला हिंदू राष्ट्र नाही, तर धर्मनिरपेक्ष राष्ट्र व्हावं हा विचार केला. तुम्ही इस्लामिक राष्ट्र पाकिस्तानची परिस्थिती पाहिली असेल. हा देश सर्वांचा आहे. इतकी विविधता तुम्हाला कुठे सापडणार नाही. अशा विविधतेच्या देशात हिंदू राष्ट्र शक्य नाही, हे देशाच्या हितासाठी योग्य नाही. सर्वांना समान अधिकार आणि संधी हा लोकशाहीचा आधार आहे, असं मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते दिग्विजय सिंग यांनी व्यक्त केलं. हिंदू राष्ट्राबद्दल त्यांना विचारलेल्या प्रश्नाला ते उत्तर देत होते.

लोकमत संसदीय पुरस्कारांच्या चौथ्या आवृत्तीचा (वर्ष २०२२) पुरस्कार वितरण समारंभ माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते १४ मार्चला दिल्लीत पार पडणार आहे. या पुरस्कार वितरण समारंभापूर्वी, तेलंगणा सरकारच्या सहकार्यानं 'लोकमत नॅशनल कॉनक्लेव्ह' होत आहे. 'भारतीय लोकशाही : परिपक्वतेच्या किती जवळ' (इंडियन डेमोक्रसी : हाऊ क्लोझ टू मॅच्युरिटी) या विषयावर विविध राजकीय पक्षातील ज्येष्ठ नेते आपले विचार मांडत आहेत. यावेळ दिग्विजय सिंह यांनी अनेक प्रश्नांची उत्तरं दिली.

दरम्यान, काँग्रेस अध्यक्ष निवडणुकीबद्दल दिग्विजय सिंह यांना सवाल करण्यात आला. “मी पक्षाच्या आदेशाचं पालन केलं. माझ्या एकाही वक्तव्यावर मला नोटीस देण्यात आली नाही. मी जे बोलतो, जे करतो ते पक्षविरोधी कधीच नसतं. मला जेव्हा समजलं मल्लिकार्जून जे माझ्यापेक्षा जास्त अनुभवी आहेत, ते जर फॉर्म भरत असतील तर मी नकार दिला,” असं त्यांनी स्पष्ट केलं. 

सर्जिकल स्ट्राईकवरही स्पष्टीकरणदिग्विजय सिंह यांनी यापूर्वी सर्जिकल स्ट्राईकवर प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका करण्यात आली होती. “माझा प्रश्न लष्कराला नव्हता. त्यांना जे टार्गेट दिलं त्यांना स्ट्राईक केला. परंतु सर्जिकल स्ट्राईकवर पहिलं वक्तव्य अमित शाह यांचं आलं की आम्ही ३०० दहशतवादी मारले. सुषमा स्वराज यांचं वक्तव्य आलं की जिथे पॉप्युलेशन नव्हतं तिथं स्ट्राईक केला. अजित नाथ म्हणाले ४५० मारले. माझं म्हणणं फक्त सरकारला होतं. राजकारणात विचारांना स्वातंत्र्याला महत्त्व असतं.” असं ते म्हणाले. राहुल गांधींनी यापासून हात झाडले पण मी माझ्या वक्तव्यावर आजही कायम असल्याचे ते राजनाथ सिंह म्हणाले. 

२०२४ चं व्हिजन काय?“काँग्रेसनं यापूर्वीच्या निवडणुकीतही जी कुटुंब दारिद्र्य रेषेखाली आहेत त्यांना सहा रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन आम्ही दिलं होतं. रोजगारासाठी योजनेचाही आम्ही उल्लेख केला होता. आजच्यापेक्षा कमी महागाई २००४-१४ मध्ये होती. आर्थिक विकासही उत्तम होता. आम्ही महागाई, बेरोजगारी आणि गरीबांची आर्थिक स्थिती कशी सुधारू शकतो यावर आम्ही प्रयत्न करू,” असं ते म्हणाले. 

टॅग्स :Digvijaya Singhदिग्विजय सिंहcongressकाँग्रेसlokmat parliamentary awardsलोकमत पार्लिमेंट्री अवॉर्ड