कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद यांच्या सचिवाच्या घरावर लोकायुक्तांचा छापा, १४ कोटी रुपये जप्त
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 12:05 IST2025-12-25T11:16:45+5:302025-12-25T12:05:48+5:30
कर्नाटकातील सिद्धरामय्या सरकारमधील मंत्री जमीर अहमद यांचे वैयक्तिक सचिव जमीर अहमद यांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकला. पथकाने १४ कोटी रुपये जप्त केले.

कर्नाटकचे मंत्री जमीर अहमद यांच्या सचिवाच्या घरावर लोकायुक्तांचा छापा, १४ कोटी रुपये जप्त
कर्नाटक काँग्रेस सरकारमधील मंत्री झमीर अहमद यांच्या स्वीय सचिवांच्या घरावर लोकायुक्तांनी छापा टाकला आहे. लोकायुक्त पथकाने छाप्यात १४ कोटी रुपये जप्त केले आहेत. बंगळुरूमधील एकूण १३ ठिकाणी छापे टाकण्यात आले आहेत. स्थानिक लोकायुक्त पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
संतापजनक! लग्नाला नकार दिल्याने भाडेकरूने तरुणीच्या आईला जिवंत जाळले; प्रकृती चिंताजनक
लोकायुक्त अधिकाऱ्याने सांगितले की, "बंगळुरू येथील सहकार संचालनालयातून गृहनिर्माण विभागात प्रतिनियुक्तीवर असलेले सरदार सरफराज खान यांच्याशी संबंधित परिसरांची आज झडती घेतली जात आहे. सरफराज खान पूर्वी ब्रुहत बंगळुरू महानगर पालिके मध्ये सहआयुक्त होते.