लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकलं, कर्नाटकमधील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2018 03:37 PM2018-03-07T15:37:00+5:302018-03-07T15:37:00+5:30
कर्नाटकचे लोकायुक्त पी. विश्वनाथ शेट्टी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर...
![Lokayukta entered the office and knocked the knife, a shocking incident in Karnataka | लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकलं, कर्नाटकमधील धक्कादायक घटना Lokayukta entered the office and knocked the knife, a shocking incident in Karnataka | लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकलं, कर्नाटकमधील धक्कादायक घटना](https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/840x630/karnataka-lokayukta-justice-vishwanath-shetty_20180364567.jpg)
लोकायुक्तांना ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकलं, कर्नाटकमधील धक्कादायक घटना
बंगळुरु : कर्नाटकचे लोकायुक्त पी विश्वनाथ शेट्टी यांना त्यांच्या ऑफिसमध्ये घुसून चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गंभीर अवस्थेत शेट्टींना मल्ल्या हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. दरम्यान, पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. हल्ला करणारा व्यक्ती कोण आहे? त्याने शेट्टी यांच्यावर हल्ला का केला? याबद्दलही माहिती अजूनही समोर आलेली नाही. हॉस्पिटल प्रशासनाकडून मिळालेल्या माहितीनुसार शेट्टी यांच्या जिवाला धोका नाही.
बंगळुरुतील लोकायुक्त कार्यालयात बुधवारी दुपारी दोन वाजताच्या सुमारास ही घटना घडल्याची माहिती आहे. लोकायुक्त पी विश्वनाथ शेट्टी त्यांच्या ऑफिसमध्ये एका प्रकरणावर सुनावणी करत असताना ही घटना घडली आहे. आरोपीनी धारदार शस्त्राने लोकायुक्तांवर हल्ला केला. तेजस शर्मा असं आरोपी हल्लेखोराचं नाव असून असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तो टुमकुरचा रहिवासी असल्याची माहिती आहे.
Bengaluru: Visual of the person who stabbed the Karnataka Lokayukta Justice Vishwanath Shetty at his office in Bengaluru. He has been taken into custody by the police. pic.twitter.com/QeaVd9QL6y
— ANI (@ANI) March 7, 2018