शहरं
Join us  
Trending Stories
1
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
2
झालं... युपीआय बॅलन्स चेकवर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
3
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?
4
Sonam Raghuvanshi : "... तर तिला फाशी द्या!", सोनम रघुवंशीचा भाऊ काय म्हणाला?
5
युक्रेनसाठी सर्वात भयावह रात्र! रशियाने केला सर्वात मोठा ड्रोन हल्ला, अनेक शहरे उद्ध्वस्त
6
99 टक्क्यांहूनही अधिकने घसरून थेट 60 पैशांवर आला होता हा पॉवर शेअर, आता 2857 टक्क्यांची तुफान तेजी!
7
लॉस एंजेलिसमध्ये भडकला हिंसाचार, पत्रकाराला अचानक लागली गोळी; अंगावर शहारा आणणारं दृष्य कॅमेऱ्यात कैद
8
"पतीला मारले, मग माझं अपहरण करून..." सोनमच्या कहाणीनं राजा रघुवंशी हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट
9
Mumbai Local Accident: स्वप्नातंल घर घ्यायला बाहेर पडला अन्...; रेल्वे अपघातात आयटी इंजिनिअरचा दुर्दैवी अंत!
10
कमाल झाली! थ्रो मारला स्ट्राइक एन्डला अन् रन आउटची विकेट मिळाली नॉन स्ट्राइक एन्डला (VIDEO)
11
Sonam Raghuvanshi : राजाच्या चेहऱ्यावर हसू अन् सोनमच्या डोक्यात हत्येचं प्लॅनिंग? लग्नातला 'तो' Video तुफान व्हायरल
12
प्रियकर राज शिलाँगला गेलाच नाही! राजाच्या हत्येची सुपारी अन् सोनमसोबत गुपचूप फोनाफोनी...   
13
२४ तासांत असे काय घडले की सोनम लगेच सरेंडर करायला आली? तिच्या साथीदारांची एक चूक...
14
लेफ्टनंट जनरल राजीव घई यांना मिळाली आणखी एक जबाबदारी; तिन्ही दलांवर असणार लक्ष
15
राजा रघुवंशीचा पोस्टमॉर्टम रिपोर्ट आला समोर, शरीरावर कुठे-कुठे आढळल्या जखमा? 
16
जिओ ब्लॅकरॉक अ‍ॅसेट मॅनेजमेंटनं तयार केली दिग्गजांची टीम, गुंतवणुकीसाठी नवीन वेबसाइटचाही श्रीगणेशा
17
Mumbai Railway Accident: ड्युटी संपवून घराकडे निघाला, तान्हुल्या बाळाला भेटायची ओढ; पण त्याआधीच मृत्यूनं कवटाळलं!
18
"देशात माणसांची किंमत नाही, रेल्वेमंत्र्यांनी तिथं जाऊन ..."; मुंबई लोकल दुर्घटनेवर राज ठाकरे संतापले
19
'मेन्यू' तोच; पण 'वेन्यू'ची अदला-बदल! टीम इंडियाच्या आगामी शेड्युलसंदर्भात BCCI नं घेतला हा निर्णय

केरळमध्ये इतिहासात पहिल्यांदाच कमळ फुललं; त्रिशूर लोकसभेवर सुरेश गोपी विजयी...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2024 19:23 IST

Lok Sabha Election Result 2024: त्रिशूर लोकसभा जागेवर भाजपच्या सुरेश गोपी यांचा दणदणीत विजय झाला.

Lok Saha Election Result 2024: यंदाची लोकसभा निवडणुकीत अतिशय धक्कादायक ठरली आहे. मोठ्या विजयाचा दावा करणाऱ्या भाजपला 300 चा आकडाही पार करता आलेला नाही. विशेष म्हणजे, देशभरात विविध ठिकाणी अनेक चकीत करणारे निकाल लागले. जिथे भाजपला विजयाची अपेक्षा होती, तिथे पराभव झाला. तर, जिथे पराभवाची अपेक्षा होती, तिथे विजय झाला. अशाच जागांपैकी केरळचा त्रिशुर मतदारसंघदेखील आहे.

केरळच्या त्रिशूर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांनी मोठा विजय मिळवला आहे. या विजयासह इतिहासात पहिल्यांदाच केरळमध्ये भाजपने आपले खाते उघडले आहे. या निवडणुकीत सुरेश गोपी यांनी त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे व्हीएस सुनील कुमार यांचा 74689 मतांनी पराभव केला आहे.

निवडणूक आयोगाच्या आकडेवारीनुसार, त्रिशूर लोकसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार सुरेश गोपी यांना 4 लाख 12 हजार 338 मते मिळाली आहेत. तर त्यांचे प्रतिस्पर्धी सीपीआयचे उमेदवार व्हीएस सुनील कुमार यांना 3 लाख 37 हजार 652 मते मिळाली आहेत. तसेच, काँग्रेसचे मुरलीधरन तिसऱ्या क्रमांकावर होते, त्यांना 3,28,124 मते मिळाली. भाजपने एक जागा जिंकली असली तरी, राज्यात काँग्रेसने प्रभावी कामगिरी करत 20 पैकी 13 जागा जिंकल्या आहेत. तर, सीपीएम दोन जागांवर तर आययूएमएल दोन जागांवर आघाडीवर आहे.

2021 च्या विधानसभा निवडणुकीत सुरेश गोपी यांचा पराभव झालेलात्रिशूर लोकसभा जागेवरील सुरेश गोपी यांचा हा विजय भाजपसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे. मात्र, या लोकसभा निवडणुकीपूर्वी सुरेश गोपी यांचा 2019 च्या लोकसभा निवडणुकीत आणि त्यानंतर 2021 च्या विधानसभा निवडणुकीत त्रिशूरमधून पराभव झाला होता. तसेच, केरळमधील तिरुवनंतपुरम लोकसभा मतदारसंघात काँग्रेस नेते शशी थरूर आणि भाजपचे राजीव चंद्रशेखर यांच्यात चुरशीची लढत झाली. विद्यमान खासदार थरूर यांचा अवघ्या 16 हजार मतांनी विजय झाला आहे.

टॅग्स :lok sabha election 2024 Resultलोकसभा निवडणूक २०२४ निकालkerala Lok Sabha Election 2024केरळ लोकसभा निवडणूक 2024BJPभाजपाcongressकाँग्रेस