शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

‘एनआरसी’वर चर्चा न करता लोकसभा तहकूब; अवघ्या काही मिनिटांतच कामकाज गुंडाळले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2020 05:46 IST

सोमवारी सकाळी बरोबर अकरा वाजता लोकसभेची बैठक सुरू होताच अभूतपूर्व घडले.

- हरीश गुप्ता नवी दिल्ली : सोमवारी सकाळी बरोबर अकरा वाजता लोकसभेची बैठक सुरू होताच अभूतपूर्व घडले. विरोधी पक्ष सत्तारूढ भाजप खासदारांच्या वादग्रस्त विधानांचा जोरदार निषेध करीत होते; तथापि, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी विरोधकांच्या निषेधाकडे दुर्लक्ष करीत प्रश्नोत्तराला सुरुवात केली; परंतु विरोधी पक्षाचे सदस्य नमते घ्यायला तयार नव्हते. राष्ट्रीय नागरिक नोंदणीशी (एनआरसी) संबंधित प्रश्न मांडण्याआधीच अध्यक्षांनी पापण्यांची उघडझाप होण्याआधीच लोकसभेचे कामकाज तहकूब केले.

यावेळी सभागृहात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा पहिल्या रांगेत बसले होते, तर प्रश्न मांडणारे टीआरएसचे एन. नागेश्वर राव हेही सभागृहात उपस्थित होते. तथापि, अशा पद्धतीने सभागृहाचे कामकाज कधीच तहकूब करण्यात आले नसल्याने आजचा प्रकार दुर्मिळच होता.बहुमत आणि विरोधकांचा आवाज क्षीण असल्याने सत्तारूढ पक्ष वाटेल त्या पद्धतीने सभागृहाचे कामकाज चालवीत असल्याने प्रत्येक जण आश्चर्यचकित आहे; परंतु सोमवारी अध्यक्षांनी मिनिटभरात सभागृह तहकूब करण्याचे कारण काय? शाहीनबाग आदी राजकीय घडामोडींवर लक्ष केंद्रित असल्याने एनआरसीच्या मुद्यावर अमित शहा यांना आणखी कोणतीही चर्चा करायची नाही. गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी लेखी उत्तरात म्हटले आहे की, तूर्त देशव्यापी एनआरसी आणण्याचा निर्णय सरकारने अद्याप घेतलेला नाही.

दिल्लीतील निवडणुकांमुळे चर्चा करण्यास सरकार इच्छुक नाही

विरोधकांच्या निषेधामुळे नव्हे, तर दिल्ली विधानसभा निवडणुकीचा प्रचार चालू असताना सरकारला एनआरसीवर लोकसभेत चर्चा करण्याची इच्छा नव्हती. सत्तारूढ भाजपला एनआरसीच्या मुद्यावरून आणखी वाद निर्माण करायचा नाही. त्यामुळे गोंधळ चालू देत सभागृह तहकूब केले.

विशेष म्हणजे सभागृहाच्या पटलावर लिखित उत्तर मांडण्यात आले. त्यात असे म्हटले होते की, राष्ट्रीयस्तरावर तूर्त सरकारने राष्ट्रीय नागरिक नोंदणी तयार करण्याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.

पंधराएक दिवसांपूर्वी पंतप्रधान मोदी यांनी एनआरसीबाबत म्हटले होते की, सरकारने यावर संसदेतही चर्चा केलेली नाही. तेव्हा एनआरसी कशी? एनआरसी आणण्याचा प्रश्न येतोच कुठे? पंतप्रधानांच्या विधानाला अनुसरूनच सभागृहात मांडलेले लेखी उत्तर आहे.

तथापि, गृहमंत्री अमित शहा यांनी हिवाळी अधिवेशनादरम्यान संसदेच्या दोन्ही सभागृहांत देशभरात एनआरसी होईल, असे म्हटले होते.

टॅग्स :National Register of CitizensएनआरसीBJPभाजपाdelhiदिल्लीcongressकाँग्रेसIndiaभारत