शहरं
Join us  
Trending Stories
1
सरकारने पहिल्याच दिवशी डाव टाकला; मनोज जरांगे बच्चू कडूंच्या शेतकरी लढ्याच्या आंदोलनात सहभागी
2
पोलिसांचे पोस्टमार्टेम कारनामे फलटणमध्येच नाहीत, शामलीमध्ये तर...; घरात चोरी झाली अन् डॉक्टर आंदोलनालाच बसले
3
डिजिटल इनव्हेस्टमेंट प्लॅटफॉर्म Groww चा आयपीओ येणार; कधीपासून आणि किती करावी लागणार गुंतवणूक?
4
आधी भर रस्त्यात कोयता नाचवला, गाडी चालकांना धमकावलं, आता पोलिसांनी त्याच ठिकाणी गुडघ्यावर बसवलं; व्हिडीओ व्हायरल
5
बिहारच्या राजकारणात Gen Z उमेदवारांची चर्चा; मैथिली ठाकूरसह कोण-कोण मैदानात? पाहा...
6
'बारामतीला जायचंय; एक रात्र राहू द्या..', पीडितेची हॉटेलमधील 'ती' रात्र; पीडितेचा हॉटेलमधील घटनाक्रम..
7
Video - चमत्कार! ३ वर्षीय मुलीच्या अंगावरून गेली कार, पुढे जे झालं ते पाहून सर्वच हैराण
8
२३ वर्षांच्या मुलाला संपवलं अन् हायवेवर फेकला मृतदेह; तपासात आईच निघाली आरोपी! नेमकं काय झालं?
9
श्रेयस अय्यरची दुखापत ठरली टीम इंडियासाठी मोठा धक्का, इतके महिने तो राहणार क्रिकेटपासून दूर
10
शायनी आहुजा कुठे गायब झाला? व्हायरल होतोय अभिनेत्याचा फोटो; ओळखणंही झालं कठीण
11
रॉबर्ट कियोसाकी यांनी सांगितला श्रीमंत बनण्याचा मार्ग; म्हणाले, "आपल्या भावनांवर नियंत्रण...."
12
"दाऊद इब्राहिम दहशतवादी नाही...", ममता कुलकर्णीचं अंडरवर्ल्ड डॉनवर वादग्रस्त विधान
13
सोन्याच्या वाढलेल्या दरांवर ग्रामपंचायतीने तोडगा काढला! महिलांना केवळ तीनच दागिन्यांची परवानगी, अन्यथा...
14
लाडकी बहीण योजना: २६ लाख अपात्र महिला, ४ हजार कोटींची खैरात; सरकारी तिजोरीवर मोठा आर्थिक भार
15
ऑनर किंलिंग प्रकरणात २० वर्षांची शिक्षा, तुरुंगातून सुटला, आता दोषी आरोपीचा अपघाती मृत्यू
16
स्वप्न साकार! नोकरी नाकारली अन् शेती केली; आता कमावते १ कोटी, ३० जणांना दिला रोजगार
17
तुमच्या पगारात किती महागडे घर खरेदी करावे? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' ४ महत्त्वाचे नियम; EMI किती असावा?
18
२५ नोव्हेंबरला राम मंदिरात दर्शन बंद राहणार, PM मोदी अयोध्येला जाणार; ८ हजार निमंत्रणे गेली
19
पारंपरिक श्रद्धा, लोककला आणि आधुनिकतेचा संगम; ‘गोंधळ’च्या ट्रेलरने वाढवली उत्सुकता
20
तब्बल ६ वर्षांनंतर भेटले डोनाल्ड ट्रम्प अन् शी जिनपिंग; दक्षिण कोरियात चालली २ तासांची बैठक!

लोकसभा निवडणूक: पंजाबला इतका दीर्घ कालावधी का दिला? मतदान थेट अखेरच्या टप्प्यात

By प्रसाद आर्वीकर | Updated: March 23, 2024 13:04 IST

पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत.

पंजाब, निवडणूक वार्तापत्र: प्रसाद आर्वीकर, लोकमत न्यूज नेटवर्क, चंडीगड: पंजाबमध्ये लोकसभेच्या १३ जागा असून तिथे सर्वाधिक ८ खासदार काँग्रेसचे आहेत. या राज्याच्या निवडणुका अखेरच्या टप्प्यात १ जूनला होणार आहेत. त्यामुळे पंजाबमध्ये तयारी करण्यासाठी तब्बल दोन महिन्यांचा अवधी राजकीय पक्षांना मिळणार आहे. 

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाची सत्ता आहे. २०२४च्या या निवडणुकीत काँग्रेसलाआपल्या ८ जागा कायम राखण्याचे, तर भाजपला आपली संख्या दोनवरून पुढे वाढविण्याचे आव्हान राहणार आहे. अवघ्या १३ जागा असलेल्या  पंजाबची निवडणूक सर्वांत शेवटच्या टप्प्यात घेतली जात असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाला पुरेसा वेळ मिळावा, हाच यामागील सत्ताधारी पक्षाचा हेतू असावा, असा सूर विरोधी पक्षांकडून आळवला जात आहे.

  • भाजप-शिअद युतीचे काय?

२०१९च्या निवडणुकीत भाजपची शिरोमणी अकाली दल पक्षासोबत युती होती. यंदा भाजप १३पैकी ५ जागांवर अडून बसल्याने युतीची गणिते अजून जुळलेली नाहीत. दुसरीकडे शिरोमणी अकाली दलाचे अध्यक्ष सुखविंदरसिंह बादल यांनी पंजाबमध्ये रथयात्रा सुरू केली असून, ते जनमत आजमावत आहेत. या रथयात्रेचा समारोप झाल्यानंतर चंडीगड येथे शिरोमणी दलाची बैठक होईल. त्यात भाजपसोबत युती करण्याबाबत निर्णय घेतला जाणार असल्याची माहिती मिळत आहे.

 

  • आप, काँग्रेस स्वतंत्र

- पंजाबमध्ये आम आदमी पार्टी आणि काँग्रेस स्वतंत्र लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आपने पहिल्या यादीत आठ उमेदवारांची घोषणा करून बिगुल फुंकले आहे. - यात मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या मंत्रिमंडळातील मंत्र्यांनाच उमेदवारी देण्यात आली आहे. तसेच काही आमदारही रिंगणात उतरविले आहेत.

२०१९ च्या निवडणुकीत...

  • काँग्रेस- ८
  • भाजपा- २
  • शिअद- २
  • आप- १
टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४PunjabपंजाबAAPआपcongressकाँग्रेसBJPभाजपाShiromani Akali Dalशिरोमणी अकाली दल